कोल्हापुरात बुधवारपासून सन्यदलातील विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे. अन्य क्षेत्रातील नोकर भरती रोडावली असल्याने आणि शेती अस्मानी-सुलतानी संकटात सापडली असल्याने सन्यभरती कार्यालयाने या प्रक्रियेचे आयोजन केले आहे. शिवाजी विद्यापीठातील क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर क्रीडा संकुलात २० फेब्रुवारीपर्यंत भरतीची प्रक्रिया चालणार आहे.
सोल्जर जनरल डय़ूटी, सोल्जर क्लार्क, स्टोअरकीपर टेक्निकल, सोल्जर टेक्निकल, सोल्जर ट्रेड्समन पदासाठी भरती प्रक्रिया होणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. यातील सुमारे ५७ हजार पात्र उमेदवार भरती प्रक्रियेत सहभागी होतील. त्यात प्रवेशपत्र (अॅडमिट कार्ड) असलेल्या उमेदवारांनाच प्रवेश दिला जाईल. या कार्डवर नमूद केल्या दिवशी आणि वेळेत भरतीसाठी प्रवेशपत्राच्या िपट्रसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. बुधवारपासून भरतीची प्रक्रिया सुरू होईल. उमेदवारांची गरसोय टाळण्यासाठी यावेळी पहिल्यांदाच तालुकानिहाय भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. भरती प्रक्रियेची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा सनिक कल्याण अधिकारी मेजर सुभाष सासने यांनी दिली. भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना जीवनमुक्ती संस्था व व्हाईट आर्मीतर्फे विनामूल्य जेवण दिले जाणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर विभागातर्फे विशेष एस. टी.ची सुविधा पुरविण्यात येणार आहे. त्यात जिल्हानिहाय उमेदवारांना बसस्थानकावरून भरतीच्या ठिकाणापर्यंत आणि भरतीनंतर तेथून थेट त्यांच्या जिल्ह्याच्या बसस्थानकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यामुळे उमेदवारांची पायपीट थांबणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Feb 2016 रोजी प्रकाशित
कोल्हापुरात आजपासून सन्यभरतीला प्रारंभ
कोल्हापुरात बुधवारपासून सन्यदलातील विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 03-02-2016 at 01:40 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army recruitment start from today