कोल्हापूर : अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांना दाउद इब्राहीमसोबत केलेल्या मनी लाँडिरग व दाउद इब्राहिमची बहीण हसीना पारकरकडून जमीन विकत घेतल्या प्रकरणी अटक झाली. राज्यातील मंत्र्याकडून झालेल्या या गंभीर प्रकरणी त्यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भाजपने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.
आंदोलनाच्या सुरुवातीला ११९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या महाविकास आघाडी सरकार व नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, भगवान काटे, गणेश देसाई, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर, विजय जाधव, हंबीरराव पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारच्या खरा चेहरा समोर येऊ लागला आहे.




जनतेच्या गरजा पूर्ण करण्या ऐवजी राज्यातील मंत्री कोटीच्या कोटी वसुली करण्याच्या व्यवस्थेत व्यस्त आहेत.
मलिक राजीनामा देत नाहीत किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असे सांगितले.