कोल्हापूर :  राशिवडे येथे शेतजमीनीच्या वादातुन  झालेल्या मारहाण आणी गोळीबार प्रकरणी  केशव आबा पाटील,विनायक केशव पाटील विलास आबा पाटील,संजय महादेव डकरे आणी मोहन तुकाराम धुंदरे यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये ३२४,३३८,५०४,१४३,१४७,१४८,१४९ आर्म अँक्ट ३० ही कलमे आहेत. प्राथमिक तपासामध्ये हवेत गोळीबार झालेला नाही असे दिसून येत असले तरी एक बंदुक ताब्यात घेण्यात आली आहे. याबाबत अजित आबा पाटील यांनी राधानगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> ब्रेकिंग न्युज’ लवकरच; श्रीमंत शाहू महाराज यांचे उमेदवारी मिळण्याचे संकेत

Election campaigning was stopped due to rain
प्रचार पाण्यात! पावसाची रिपरिप प्रचाराच्या मुळावार, उमेदवार घरातच
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
Navi Mumbai, Youth Attacks, Man, Broken Glass Bottle, Alleged Spitting Incident, police, crime news, marathi news,
नवी मुंबई: थुंकल्याच्या क्षुल्लक कारणावरून फुटलेल्या काचेच्या बाटलीने गळ्यावर वार 
26 year old youth murdered in bibvewadi
पुणे: बिबवेवाडी येथे तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

याबत फिर्यादीने दिलेली तक्रार पुढीलप्रमाणे,फिर्यादी स्वत:अजित आबा पाटील व त्यांचा मुलगा अक्षय मानकांड नावाच्या शेतामध्ये वैरण आणण्यासाठी गेले असता तेथील विहीरीजवळील ऊस तोडून नेत असताना अडविले म्हणुन मला व मुलगा अक्षय याला मारहाण करत  शिवीगाळ केली,त्यावेळी केशव  पाटील व संजय डकरे यांनी हवेत गोळीबार केला.तसेच मुलगा अक्षय व मी भितीने पळून जात असताना केशव पाटील ,विलास पाटील यांनी दगड फेकुन मारला.तर मुलगा अक्षयला सोडविण्यासाठी गेलेवर  संजय व विनायकने लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले तर  मोहन धुंदरे यांनी शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. अधिक तपास पो.उपनिरीक्षक विजयसिंह घाटगे कत आहेत.