तीन लाखाची लाच घेताना एकाच रंगेहात पकडले; कोल्हापुरात कारवाई

अप्पर पोलीस अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या पथकाने केली कारवाई

शेत जमिन वादाचा निकाल आपल्या बाजूने देतो, असे सांगून 3 लाख रुपयांची लाच स्वीकारताना तिघा एंजटाना लाच लुचपत प्रतिबंध विभागाने मंगळवारी दुपारी रंगेहाथ पकडले. भिकाजी नामदेव कुराडे (वय ५५), त्याचा मुलगा सारंग भिकाजी कुराडे ( वय २६, दोघे रा. चंदूर, ता. हातकणंगले), इम्रान मुसा शेख ( वय ४१, रा. १०० फुटी रोड सांगली ) अशी त्याची नावे आहेत.

ही कारवाई इचलकरंजी शहरातील मध्यवर्ती बसस्थानकासमोरील एका हॉटेलजवळ झाली. या प्रकरणी आणखी दोन नावे निष्पन्न झाली आहेत. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या पथकाने केली.

४६ वर्षीय तक्रारदार यांच्या शिरोळ तालुक्यातील शेत जमिनीच्या मालकीचा वाद अप्पर जिल्ह्याधीकारी कार्यालयात सध्या सुरू आहे.
तक्रादार यांच्याशी कुराडे यांनी संपर्क साधून निकाल आपल्याबाजूने लावून देण्यासाठी ५ लाख रुपयांची लाचेची मागणी केली. त्यातील 2 लाख रुपये कुराडे यांनी घेतली होती. उर्वरित 3 लाखाची रक्कम घेत असताना कुराडे हे लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात सापडले. या प्रकरणात आणखी दोन नावे निष्पन्न झाली आहेत. यामध्ये कुराडे याच्या मुलाचा समावेश आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Caught in the same ring while taking a bribe of three lakhs action in kolhapur srk

ताज्या बातम्या