कोल्हापूर : सरत्या वर्षाला निरोप देताना पुढील वर्षी कोल्हापूर निरोगी आणि थुंकीमुक्त करण्यासाठी चळवळ व्यापक करण्याचा संकल्प रविवारी म.ताराराणी चौकात केला गेला. यासाठी कोल्हापूरकर रस्त्यावर उतरले होते. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याने रोगराई पसरते. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होते. तरीही नागरिकांची थुंकण्याची सवय काही गेलेली नाही.अशा थुंकीचंदांना वठणीवर आणण्याचा प्रयत्न अँटीस्पिटिंग कोल्हापूर ही चळवळ गेले तीन वर्षापासून करत आहे.

चळवळीद्वारे प्रशासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी यांना अनेकदा, दंडनीय व कठोर कारवाई व्हावी याकरता निवेदने सुद्धा दिली गेली. पण तरीही बळ मिळत नसल्याने आज सरत्या वर्षाला निरोप देताना पुढील वर्षी कोल्हापूर निरोगी आणि थुंकीमुक्त करण्यासाठी चळवळ व्यापक करण्याचा संकल्प म.ताराराणी चौकात केला गेला. “आपली शाहूनगरी, करू थुंकी मुक्त आणि निरोगी”, “थुंकी चंदांचा निषेध असो”, “खा मावा ,मोज घटका”, “काका मामा थुंकता तुम्ही, आजारी पडतो आम्ही” अशा घोषणा देत रस्त्यावर थुंकणारी व्यक्ती आढळल्यास तिला स्वच्छता करायला भाग पाडून सार्वजनिक स्वच्छतेसाठी शपथ घ्यावयास लावली. तसेच प्रबोधनपर फलक दुकानांमध्ये चिकटवण्यात आले.

Pune, Father, murder son, pune latest news,
पुणे : वडिलांनी दिली मुलाला मारण्यासाठी ७५ लाखांची सुपारी
Pune, Father to Kill Son, Construction developer s Murder Attempt , Family Feud, crime in pune, pune murder planning, pune news, marathi news, murder plan in pune, firing in pune,
पुणे : कौटुंबिक वादातून वडिलांनीच दिली मुलाची सुपारी, जंगली महाराज रस्त्यावरील गोळीबाराचा उलगडा
Bhavesh Bhandari and his wife Jinal
Video: रथातून मिरवणूक, मौल्यवान वस्तू फेकल्या; जैन भिक्षूक होण्यासाठी २०० कोटी केले दान
The district administration announced the list of campaign materials along with food items in the list fixed to account for Lok Sabha election expenses pune
जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यात आणली ‘स्वस्ताई’; जाणून घ्या कशी?

आणखी वाचा-कोल्हापुरातील जनमित्र श्रीकांत कदमची ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’; कौशल्य पणाला लावून फिडरचा ६० हजाराचा खर्च झाला फुकटात

या उपक्रमात दीपा शिपुरकर ,राहुल राजशेखर, विजय धर्माधिकारी, सागर बकरे यांनी केले. सारिका बकरे, ललिता गांधी, नीना जोशी, सुधीर हंजे, मोहन सातपुते, मयूर गोवावाला, अमरदीप पाटील, भानुदास डोईफोडे, प्रसाद नरुले, संघसेन जगतकर,डॉ. देवेंद्र रासकर, अनिल कांझर, डॉ. तृप्ती करेकट्टी, दिपाली जाधव ,सुरज मोहिते, सुजाता पाटील यांचा उपक्रमास सक्रिय सहभाग होता. कृष्णा गांधी, सार्थ करेकट्टी, नारायणी जाधव ही छोटी मुलेही स्वच्छतेचा संदेश द्यायला पुढे सरसावली होती. प्रशांत पितालिया ,अभी जाधव, अरुण कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.