कोल्हापूर : कौशल्य, संधी आणि मेहनतीची तयारी हेच यशाचे सुत्र असल्याचे जनमित्र श्रीकांत कदमने एका फिडरचा तांत्रिक बिघाड झालेला ब्रेकर दुरुस्त करून सिद्ध केले आहे.

नादुरुस्त झालेला फिडर दुरुस्त करण्यासाठी साठ हजार रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र कौशल्य पणाला लावून कदम यांनी हे काम अगदीच सहजगत्या केले. आणि महावितरणच्या तिजोरीला धक्काही न लावता अगदी फुकटात म्हणता येईल असे हे काम फक्त केले. अडचणीच्या काळातील महावितरणला हा आर्थिक दिलासा ठरला म्हणायचे. ‘जहाँ तुम्हारी सोच .. वहीसे हमारी सोच शुरु होती है! ‘ असेच बहुधा श्रीकांत आपल्या मनाशी सांगत असेल. या कामामुळे ग्रामीण भागातील वीज यंत्रणा खंडित होण्याची शक्यता होती. पण या कामामुळे वीजपुरवठा अव्याहत सुरू राहिल्याने ग्रामीण बँक प्रकाशमान राहिला. हा आणखी एक फायदा.

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
Pune, School boy beaten,
पुणे : नदीपात्रात शाळकरी मुलाला मारहाण; विवस्त्रावस्थेतील चित्रफीत प्रसारित
ग्रामविकासाची कहाणी

आणखी वाचा-सर्व मंत्र्यासमोर १ जानेवारीपासून इचलकरंजीत निदर्शने; पाणी प्रश्न तापला

घटना अशी घडली होती की, कोल्हापूर जिल्ह्यातील महावितरण शिराळा उपविभागातील शिरशी ३३/११ केव्ही उपकेंद्रातील ११ केव्ही टाकवे कृषी फिडरच्या ब्रेकरचे ऑपरेटिंगमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने फिडर बंद झाला की पुन्हा चालू होत नव्हता. पुन्हा ब्रेकर चालू करण्यात बराच वेळ लागत होता. परिणामी विद्युत पुरवठा तितक्या वेळासाठी खंडित राहायचा. अर्थातच ग्राहकातून तक्रारीचे प्रमाण वाढले होते. देखभाल व दुरुस्तीसाठी सबंधित एजन्सीला कळविले असता तो ब्रेकर खूप जुना झाला आहे. यापूर्वी देखील दुरुस्त करण्यात आला आहे. ब्रेकर बंद-चालू होण्यासाठी आवश्यक तांत्रिक भाग नवीन बसवावा लागेल असे सांगितले. सदर कामासाठी अंदाजे साठ हजाराच्या घरात खर्च कळविला.

आणखी वाचा-प्रोत्साहनपर अनुदानासाठी शेतकऱ्यांचे कोल्हापूर जिल्हा बँकेवर आंदोलन

शिरशी शाखा कार्यालयातील तंत्रज्ञ श्रीकांत कदम यांना ही बाब समजली. ‘जिथे कमी तिथे आम्ही’ असे म्हणत ऑपरेटरसोबत चर्चा करून संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन श्रीकांतने पुढाकार घेतला आणि हा ब्रेकर खोलून पहिला. ब्रेकर बंद करतेवेळी रॉडला जो स्ट्रोक बसतो. तो बसत नव्हता, हे श्रीकांतच्या लक्षात आले. इतरही काही तांत्रिक बिघाड होते. ते सगळे बिघाड दुरूस्ती करण्याचे काम श्रीकांतने हाती घेऊन पुर्ण केले.

आता सदरील ११ केव्ही फिडर ब्रेकर मॅन्युअल व रिमोट या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमद्वारे व्यवस्थित चालू वा बंद होतो आहे. श्रीकांतने घेतलेला पुढाकार अनेक धडे देताना अखंडित प्रकाश देऊन जातो. ग्रेट श्रीकांत! अशीचं प्रतिक्रिया महावितरण परिवारातून, ग्राहकांमधून प्रकट होते आहे.