पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव यांच्या विरोधात शहरातील महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उच्च शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे शुक्रवारी तक्रार केली. याबाबत लवकरच चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री पाटील यांनी त्यांना आश्वस्त केले.

हेही वाचा >>> कोल्हापुरात ‘शह-काटशह’चे राजकारण ; जिल्हा सहकारी बँक पोटनियम दुरुस्तीचे निमित्त

MNS workers are active in the campaign of Sunetra Pawar In Baramati
बारामतीत मनसेचे कार्यकर्ते सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रीय
devendra fadnavis reaction on Firing at Salman Khan galaxy apartment in mumbai
सलमान खानच्या घरावर गोळीबार, फडणवीस म्हणाले “विरोधकांनी…”
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार

भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांचे व्याख्यान येथील केशवराव भोसले नाट्यगृहात आयोजित केले होते. हा कार्यक्रम संपल्यानंतर मंत्री पाटील हे कार्यक्रमस्थळा वरून मोटारीतून अन्य ठिकाणी निघाले होते. याचवेळी भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या एका गटाने त्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. त्यांनी भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव यांच्या विरोधात निवेदन देऊन त्यांनी अपमानास्पद वागणूक देत असल्याच्या तक्रारी केल्या.त्यावर पाटील यांनी भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. त्याचे पालन केले पाहिजे. पक्षांतर्गत मतभेदाचे उघडपणे निवेदन देणे अयोग्य आहे. घरातील भांडणे घरात मिटवली जातात हे समजले पाहिजे. मला याबाबतची माहिती आहे. लवकरच याबाबत एकत्र बसून बोलू, असे त्यांनी आश्वस्त केले.

हेही वाचा >>> कोल्हापूर जिल्ह्यात एकरकमी एफआरपी शक्य ;  अन्यत्र साखर कारखान्यांची आर्थिक अवस्था बिकट

गटबाजीची चर्चा
व्याख्यानावेळी भंडारी यांनी सांघिकपणे पक्ष वाढवण्याचे आवाहन केले होते. पण ते संपून काही मिनिटे होतात न होतात तोच भाजपमधील गटबाजी भर रस्त्यावर उफाळून आल्याने त्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होत होती.