केड्राई कोल्हापूरच्या वतीने दर तीन वर्षांनी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य अशा ‘दालन’ या बांधकाम विषयक प्रदर्शनाचे आयोजन येथे शुक्रवार (दि.२९) ते सोमवार (दि.१)या कालावधीत होत आहे. या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली असून या प्रदर्शन कालावधीत ५ लाख लोक भेट देतील. नव्या प्रकारचे बांधकाम, तंत्रज्ञान, साहित्य सेवा, अर्थसाहाय्य आदिबाबतची माहिती दक्षिण महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक व कोकणातील ग्राहकांना एका छताखाली व सखोलपणे उपलब्ध होणार आहे, अशी माहिती दालन अध्यक्ष कृष्णा पाटील, समन्वयक चेतन वसा, सचिव संजय डोईजड यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, केड्राईचे सुमारे ८२ सभासद असून शंभराहून अधिक प्रकल्प दालनमध्ये सादर होणार आहेत. या प्रदर्शनामुळे निकोप स्पर्धा वाढीस लागून ग्राहकास वाजवी किमतीमध्ये सुविधांनी परिपूर्ण गृहप्रकल्पातील चांगले पर्याय उपलब्ध होणार आहेत. मध्यवर्ती बसस्थानका शेजारी असलेल्या शाहूपुरी जिमखान्याच्या पटांगणावर आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी (दि.२९ )सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते व गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहता यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. सांगता समारंभास सोमवारी (दि.१) विभागीय आयुक्त एस. चोकीिलगम, जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी, महापालिका आयुक्त पी.शिवशंकर यांची प्रमुख उपस्थिती आहे.
शनिवारी (दि.३०) कोईमतूरचे बांधकाम तज्ज्ञ डॉ. एल.एस. जयागोपाल यांचे हायराईज बििल्डग्ज् आणि डिझायिनग, रविवारी (दि. ३१) डॉ. संजय उपाध्ये, पुणे यांचे ‘घर म्हणजे चतन्यांच्या भिंती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
या वेळी केड्राई कोल्हापूरचे अध्यक्ष महेश यादव, उपाध्यक्ष सुदेश होसमणी, सचिव विद्यानंद बेडेकर, राजीव परिख, के.पी. खोत आदी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jan 2016 रोजी प्रकाशित
क्रेडाई कोल्हापूरच्या वतीने शुक्रवारपासून बांधकामविषयक प्रदर्शनाचे आयोजन
या प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली असून या प्रदर्शन कालावधीत ५ लाख लोक भेट देतील.
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 28-01-2016 at 03:22 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction exhibition credai