कोल्हापूर: सर्वसामान्य नागरिकांना लोक सेवा देण्यामधे कोल्हापूर जिल्हा सांगली पाठोपाठ पुणे विभागात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ️जिल्ह्यात ९७ टक्के अर्ज निकाली निघाले असून हे कार्य अभिनंदनीय आहे, असे मत राज्य सेवा हक्क आयोगाचे राज्य आयुक्त दिलीप शिंदे यांनी मंगळवारी व्यक्त केले.

जिल्हा प्रशासनातील महसूल व इतर विभागांचा विविध सेवांच्या बाबतीत जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी अमोल येडगे, अतिरीक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, सर्व विभाग प्रमुख, प्रांत व तहसिलदार उपस्थित होते.

Nagpur, Maherghar, safe delivery
नागपूर : सुरक्षित प्रसूतीसाठी चार माहेरघर कधी?
bus
जिल्हाधिकाऱ्यांनी अडीच हजार वाहने घेतली ताब्यात
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला
Naxalites killed
बालाघाट जिल्ह्यात पोलीस – नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार

हेही वाचा >>>नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू झाल्याने भाजपचे इचलकरंजीत साखर वाटप

यावेळी खोत म्हणाले, जिल्ह्यात ५ मार्च पर्यंत ७. ६६ लाख अर्ज आले. यातील ६.६९ अर्ज निकाली निघाली. ७४ हजार ३११ अर्ज प्रक्रियेत आहेत. वेळेत निकाली काढलेल्या अर्जाची टक्केवारी ९७ टक्के आहे.जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उर्वरीत अर्ज, प्रकरणेही वेळेत निकाली काढू, आवश्यक प्रशिक्षणांचे आयोजन करुन पोर्टलबाबतची माहिती सर्वांना दिली जाईल, असे आश्वासन आयुक्तांना दिले.

कार्यालयांना भेटी

दिलीप शिंदे यांनी जिल्हा परिषद, पंचायत समिती, तहसिलदार कार्यालय तसेच एका आपले सरकार सेवा केंद्राला भेट देऊन सूचना फलक, अर्ज नोंद वही पहिली. उपस्थित अर्जदारांशी संवादही साधला.