scorecardresearch

कोल्हापूर : आरोग्य उपसंचालक भावना चौधरी लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडल्या

कोल्हापूर येथील आरोग्य उपसंचालक भावना सुरेश चौधरी या लाचेची रक्कम स्वीकारताना गुरुवारी रंगेहात पकडल्या गेल्या.

कोल्हापूर : आरोग्य उपसंचालक भावना चौधरी लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडल्या
( आरोग्य उपसंचालक भावना चौधरी )

कोल्हापूर येथील आरोग्य उपसंचालक भावना सुरेश चौधरी या लाचेची रक्कम स्वीकारताना गुरुवारी रंगेहात पकडल्या गेल्या. कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम सुरू असताना त्यांच्यावर कारवाई झाल्याने त्याची चर्चा होत आहे..

तक्रारदाराने भविष्य निर्वाह निधीच्या कामासाठी आरोग्य उपसंचालक भावना चौधरी यांच्याशी संपर्क साधला होता. तक्रारदारास मिळणाऱ्या ९० टक्के रकमेतील ६ लाख ७२ हजार रुपये मंजूर करण्यासाठी १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ५ हजार रुपये देण्याचे ठरले होते.

तक्रारदाराने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यावर सापळा रचून आज भावना चौधरी या लाचेची रक्कम घेत असताना सापडल्या. रक्षाबंधन आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा कार्यक्रम या निमित्ताने नटून थटून आलेल्या चौधरी या कारवाईच्या जाळ्यात सापडल्या. सेवानिवृत्ती एक वर्ष कमी असताना त्यांच्यावर ही कारवाई झाली आहे.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या