महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी, ताराराणी आघाडी व काँग्रेस आघाडी सरकारची सत्ता होती, त्या वेळी महापौरपदासह इतर पदांची खांडोळी करून शहराच्या विकासाचे कोणतेही प्रश्न सोडवले नाहीत. महापालिकेमध्ये पारदर्शक काम आणि शहराचा विकास करणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी येथे सभेत केले.
शाहूपुरी परिसरात प्रचार सभा पार पडली. या वेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून सभेस सुरुवात केली. या वेळी डॉ. कोल्हे म्हणाले, १९७५ पासून गेली चाळीस वष्रे महापालिकेत काँग्रेसने कोणतेही विकासाचे काम केले नाही. सध्याच्या राजकारणामध्ये महापालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी राष्ट्रवादी, ताराराणी आघाडी व काँग्रेस हे एकमेकांचे विरोधक म्हणून काम करत आहेत. सत्ता मिळवण्यासाठी परत एकत्र येत आहेत. त्यांच्या पंगतीला कमळाबाई जाऊन बसली आहे. सत्तेसाठी एकत्र येणाऱ्या विरोधकांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ. राजर्षी शाहूंच्या विचाराने विकासाची कामे करणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून द्या. पारदर्शक कारभाराची हमी पक्ष आश्वासन देत आहेत, पण शिवसेना वचन देते. महापालिकेवर भगवा फडकवा, असे आवाहन केले.
या वेळी आमदार राजेश क्षीरसागर, माजी नगरसेवक दिलीप शेट्टे, युवा सेनेचे अध्यक्ष हर्षल सुर्वे, विद्यार्थी सेनेचे चेतन िशदे आदींची भाषणे झाली. या वेळी व्हीनस प्रभागातून शिवसेनेचे उमेदवार राहुल चव्हाण आणि शाहूपुरी तालीम प्रभागातून वैष्णवी समर्थ यांच्यासह कार्यकत्रे उपस्थित होते.