देशातील महिलांचा सहकारी तत्त्वावरील पहिल्या इंदिरा गांधी महिला सहकारी साखर कारखान्यास ११४ कोटी रुपयांच्या थकबाकीपोटी शुक्रवारी आयडीबीआय बँकेने टाळे ठोकले. बँकेकडून या कारखान्याची लवकरात लवकर विक्री होणार आहे.

देशातील महिलांचा सहकारी तत्त्वावरील पहिला कारखाना म्हणून तांबाळे (ता. भुदरगड) येथे या कारखान्याची सुरुवात झाली होती. व्यवस्थापनाचे नियोजन, आíथक गणित बिघडल्याने कारखान्याचे धुराडे फार काळ पेटते राहू शकले नाही. परिणामी सन २००३-४ ला स्वबळावर ऊस गाळप चालू केलेला हा महिला कारखाना चुकीच्या धोरणामुळे लवकर बंद करावा लागला. नंतर तो ‘गोदावरी शुगर्स’ यांना भाडेतत्त्वावर चालवण्यास दिला. कारखाना सुरळीत चालू असताना संचालक मंडळ व ‘गोदावरी शुगर्स’ यांच्यातील अंतर्गत मतभेदामुळे संचालक मंडळाने तो पुन्हा ताब्यात घेतला. नंतर एक वर्ष स्वत: चालवून पुन्हा ‘शक्ती शुगर्स’ या खासगी कंपनीस भाडेतत्त्वाने दिला. परंतु, त्यांच्याशीही संचालक मंडळाचे जमले नाही. नंतर हा कारखाना बंद अवस्थेत राहिला. या कारखान्यावर जिल्हा बँक व आयडीबीआय बँकेचे कर्ज आहे. कर्जाची ही थकबाकी ११४ कोटींवर गेली होती. एकरकमी परतफेड (ओटीएस) खाली ८० कोटी रुपयांत ही तडजोड करण्यात आली होती. या परतफेडीसाठी २० जून ही अंतिम मुदत दिली होती.  परतफेड न झाल्याने आयडीबीआय बँकेने कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेऊन कारखान्यास शुक्रवारी टाळे ठोकले. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Success Story Mira Kulkarni
एकट्या मातेची मेणबत्ती व्यवसायाने सुरुवात; भारतातील सर्वांत श्रीमंत महिलांच्या यादीतील स्थानापर्यंत गरुडझेप!
Amul dominates the Mumbai milk market
मुंबईच्या दूध बाजारपेठेवर ‘अमूल’चे वर्चस्व
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क

कर्मचारी पगाराविना

कारखान्यात एकूण ३४० कर्मचारी असून, त्यापकी कायम २३० कर्मचारी, हंगामी ११० कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. किमान दोन ते अडीच वर्षांंपासून कर्मचारी पगाराविना असल्याने त्यांची अवस्था दयनीय झालेली आहे.