कोल्हापूर: राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुसज्ज व अद्ययावत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या निविदेची कार्यवाही दोनच दिवसात पूर्ण होईल. अशा प्रकारे शेंडा पार्क येथे येत्या काळात चार ते पाच हजार विद्यार्थी आणि रुग्णांची सोयी सुविधा असलेली वैद्यकीय नगरी साकार होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांच्याहस्ते दाऊदी बोहरा समाजाकडून दिलेल्या विविध वैद्यकीय साहित्याचे हस्तांतरण सीपीआरकडे करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री म्हणाले, कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयामध्ये दाऊदी बोहरा समाजाने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, ज्यामुळे स्थानिक समाजाला दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सुविधा आणि सेवांमध्ये वाढ होईल. त्यांचे धर्मगुरु हे काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात आले होते. रुग्णसेवेच्या दृष्टीने अत्यावश्यक असलेल्या या साधनसामग्रीचा सीपीआरला पुरवठा करण्याच्या त्यांनी सूचना केल्या होत्या. यावेळी उद्घाटन समारंभास  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापुरातील दाऊदी बोहरा समाजाचे अध्यक्ष अलीअसगर चन्नीवाला, अमील शेख, छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय अधिष्ठाता डॉ.सत्यवान मोरे, लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.  

यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, वैद्यकीय उपकरणांचा सर्व जातीधर्मीयांना उपयोग होईल.  सहा लक्ष रुपयांच्या या साहित्याची गरज आरोग्य क्षेत्रात नक्कीच होईल. ज्यामध्ये मायक्रोस्कोप, सक्शन मशीन, ध्वनी प्रणाली आणि प्रगत आर.ओ. वॉटर सिस्टीम यासारख्या अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे, ज्यामुळे रुग्णालयाला वंचित रुग्णांना कार्यक्षम सेवा प्रदान करण्यात मदत होईल आणि क्षमतेत लक्षणीय वाढ होईल. ते पुढे म्हणाले, एकूण ११०० बेड्सचे सुसज्ज व अद्ययावत हॉस्पिटल येत्या काळात सुरु होत आहे. त्याअंतर्गत सामान्य रुग्णालय व बाह्यरुग्ण विभाग ६०० बेड्स, कॅन्सर हॉस्पिटल २५० बेड्स, सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल २५० बेड्स यांचा समावेश असेल. शेंडा पार्क ही वैद्यकीय नगरी करण्याचा आमचा मानस असून त्यासाठी पुढील कामांसाठी लागणारा आवश्यक निधीही देण्यात येईल. कालांतराने शेंडा पार्क ही वैद्यकीय नगरी म्हणून उदयाला येईल. यावेळी त्यांनी सीपीआर प्रशासनाला हॉस्पिटल बदनाम होणार नाही, यासाठी काम करा अशा सूचना दिल्या. 

yavatmal, Fire Breaks Out, Gynecology Department, Yavatmal government Medical College, No Casualties Reported, vasantrao naik government Medical College , fire in hospital, fire in yavatmal hospital,
यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रिया गृहास आग, रूग्ण नसल्याने जीवितहानी टळली
A case has been registered against a minor in connection with the death of a student in a municipal school
महापालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल
Nursing Student s Suicide Prompts Summer Vacation
नागपुरात विद्यार्थिनीच्या आत्महत्येनंतर वसतिगृह रिकामे, महाविद्यालय प्रशासनाने मग…
MBBS student medical Nagpur
नागपूर : ‘एमबीबीएस’च्या विद्यार्थ्याने स्वत:ला खोलीत कोंडले !

हेही वाचा >>>शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटल आणि महाविद्यालयाचे डीन, डॉ. सत्यवान मोरे म्हणाले, ६६५ खाटांची क्षमता असलेले अग्रगण्य सरकारी रुग्णालय म्हणून आम्ही कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमावरील रुग्णांना आरोग्य सेवा प्रदान करतो. दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरू सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांनी दिलेली देणगी, ज्यामध्ये मायक्रोस्कोप, सक्शन मशीन, ध्वनी प्रणाली आणि प्रगत आर.ओ. वॉटर सिस्टीम यासारख्या अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे, ज्यामुळे रुग्णालयाला वंचित रुग्णांना कार्यक्षम सेवा प्रदान करण्यात मदत होईल आणि क्षमतेत लक्षणीय वाढ होईल, असे डॉ. सत्यवान मोरे म्हणाले.

कोल्हापुरातील दाऊदी बोहरा समाजाचे सचिव शाकीर पटवा यांनी सांगितले की, परमपावन सैय्यदना मुफद्दल सैफुद्दीन साहिब यांच्या नुकत्याच कोल्हापूरच्या भेटीदरम्यान, त्यांनी रुग्णालयाच्या वैद्यकीय पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्याची विनंती कृपापूर्वक स्वीकारली. हे सय्यदना साहेबांचे आणि त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. दाऊदी बोहरा समाज हा लोकांचे आरोग्य आणि कल्याण सुधारण्याच्या निरंतर वचनबद्धतेचा पुरावा आहे. ते पुढे म्हणाले, ही देणगी दाऊदी बोहरा समुदायाचा जागतिक परोपकारी उपक्रम ‘प्रोजेक्ट राईझ’ चा एक भाग आहे. हा प्रकल्प समाजातील सर्व घटकांसाठी उज्वल आणि आरोग्यदायी भविष्याला चालना देण्यासाठी समर्पित आहे आणि हे योगदान त्या ध्येयाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. दाऊदी बोहरा समाज अंदाजे 150 वर्षांपासून कोल्हापुरचा एक भाग आहे, सध्या २५० हून अधिक समुदाय सदस्य आहेत. समुदाय मुख्यतः हार्डवेअर, मशिनरी उत्पादन निर्मिती आणि मध्यम उद्योग यासारख्या व्यवसायांमध्ये गुंतलेला आहे आणि त्यात औषध आणि कायद्याच्या क्षेत्रातील व्यावसायिकांचाही समावेश आहे.