कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर बुधवारी प्रशासनाकडून अचूक आकडेवारीची तर उमेदवारांच्या समर्थकांना कडून मताधिक्याची आकडेमोड सुरू होती. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात काल जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा मतदानाचा सुमारे सव्वा टक्का असा किंचित वाढला आहे. हातकणंगले मतदारसंघात मात्र तो सुमारे ३ टक्के असा तुलनेने चांगलाच वाढला आहे.
हेही वाचा >>> जनतेकडून सहलीच्या रजा मंजुरीचा मंत्र्यांचा फंडा; हसन मुश्रीफ यांच्यासह कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक परदेश दौऱ्यावर
जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघात काल चुरशीने मतदान झाले होते. मतदानानंतर कोल्हापूर मतदारसंघात ७०.३५ टक्के तर हातकणंगलेमध्ये ६८.०७ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले होते. आज त्यामध्ये वाढ झाली आहे. प्रशासनाने अंतिम मतदान आकडेवारी व टक्केवारी जाहीर केली. कोल्हापूर – ७१.५९ टक्के आणि हातकणंगले – ७१.११ टक्के याप्रमाणे आकडेवारी जाहीर केली आहे.
हेही वाचा >>> लाल परी ‘इलेक्शन ड्युटी’वरी; परी प्रवासी वाऱ्यावरी
विजय आमचाच ! दरम्यान, या आकडेवारीच्या आधारे आपलाच विजय होणार असा दावा महायुती -महाविकास आघाडी कडून केला जात आहे. शाहू महाराज हे दोन लाखाहून अधिक मताधिक्याने विजयी होतील असा दावा आहे. संजय मंडलिक हे भरघोस मताधिक्य घेऊन विजयी होतील असे समर्थक सांगत आहेत. हातकणंगले मतदारसंघात धैर्यशील माने, पाटील, राजू शेट्टी यांना चांगले मतदान झाले आहे. तिघांच्याही समर्थकांनी किमान ५० हजाराहून अधिक मताधिक्याने विजयी होऊ असा दावा केला. त्यावरून अनेक ठिकाणी मोठ्या रकमेच्या पैजा लागल्या असून गावागावात , पारावर तावातावाने चर्चा सुरु होती.