कोल्हापूर जिल्हय़ाचा सर्वाधिक ८८.८१ टक्के निकाल
राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या निकालात कोल्हापूर विभागात मुलींनी बाजी मारली असून, कोल्हापूर जिल्हय़ाचा सर्वाधिक ८८.८१ टक्के निकाल अव्वल लागला. सांगली ८७.९० तर सातारा ८७.३२ टक्के निकाल आहे. निकालाची सरासरी ८८.१० आहे. राज्य मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांमार्फत १८ फेब्रुवारी ते २८ मार्च या कालावधीत बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली होती. बारावीच्या ४२ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. एकूण निकाल ८८.१० टक्के आहे.
विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक लागला (९५.३८) आहे. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या ४८ हजार ५२३ विद्यार्थ्यांपकी ४६ हजार २८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल ७७.३१ टक्के आहे. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या ४१ हजार २८९ विद्यार्थ्यांपकी ३१ हजार ९२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेचा निकाल ९२.५२ टक्के असून परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या २४ हजार ७६५ विद्यार्थ्यांपकी २२ हजार ९१३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. किमान कौशल्य शाखेचा निकाल ८५.१९ टक्के लागला आहे. परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या ६ हजार ४२ विद्यार्थ्यांपकी ५ हजार १४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना निकालाची मूळ प्रत ३ जून रोजी मिळणार आहे. याचबरोबर यंदा ९ जुलपासून बारावीची पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hsc result 2016 in kolhapur
First published on: 26-05-2016 at 03:31 IST