कोल्हापूर : अवैधरीत्या गर्भपात करणाऱ्या टोळीतील तिघांवर पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली. तर एक एजंट पसार झाला आहे. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात दोन बोगस डॉक्टरांसह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना पडळ (ता. पन्हाळा) येथील एका रुग्णालयात अवैध गर्भपात करणारी टोळी कार्यरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शासकीय रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, पन्हाळा पंचायत समितीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कवठेकर, डॉ. सुनंदा गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक श्रद्धा आंबले, पोलीस रूपाली यादव यांच्या पथकाने या टोळीवर कारवाई केली. हर्षल रवींद्र नाईक (वय ४०) व उमेश लक्ष्मण पोवार (वय ४६) या दोन बोगस डॉक्टरसह दत्तात्रय महादेव शिंदे (वय ४२, रा. पडळ) यांना अटक केली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आहे. एजंट भरत पोवार पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे. शैक्षणिक अर्हता आणि वैद्यकीय परवाना त्यांच्याकडे नसल्याचे पोलीस तपासात आढळले आहे.