कोल्हापूर : येथील कळंबा कारागृहात गंभीर गुन्ह्यातील एका कैद्याचा निर्घृण खून झाल्याने कळंबा कारागृहातील अनागोंदी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या मुन्ना उर्फ मोहम्मद अलीखान उर्फ मनोजकुमार भवरलाल गुप्ता (वय ७० ) याचा कळंबा कारागृहात खून केल्याची घटना रविवारी सुमारात घडली. कारागृहातील पाच न्यायालयीन बंदीनी ड्रेनेजच्या लोखंडी झाकणाने खून केला असल्याचे सांगण्यात येते.

कोल्हापुरातील कळंबा कारागृह म्हणजे बेबंदशाही कारभाराचा उत्तम नमुना बनला आहे. येथे सातत्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे , घटना घडत असताना. त्यावर कोणाचाच वचक नसल्याचे दिसत आहेत . आजची घटना पुन्हा एकदा हे सिद्ध करणारी ठरली आहे.

हेही वाचा…कोल्हापुरात मतमोजणी वेळी राजकीय कार्यकर्ते ‘आधे  इधर आधे उधर’

१९९३ सालच्या बॉम्बस्फोटातील आरोपी मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता हा सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारागृहातील हौदावर अंघोळीला गेला होता. यावेळी कारागृहातील इतर कैद्यांसोबत त्याचा वाद झाला .हा वाद विकोपाला गेला. त्यातून कैद्यांमध्ये हाणामारी सुरू झाली. यावेळी कैद्यांच्या एका गटाने मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता याच्यावर हल्ला चढवला. त्याला ड्रेनेजच्या लोखंडी झाकणाने मारहाण केली. या मारहाणीत मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान उर्फ मनोज कुमार भवरलाल गुप्ता याचा मृत्यू झाला.

हेही वाचा…कोल्हापुरात निवडणूक निकालावरून गप्पांचे फड रंगले; लाखमोलाच्या पैजा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

न्यायालयीन बंदी आरोपी प्रतीक उर्फ पिल्या सुरेश पाटील, दीपक नेताजी खोत, सौरभ विकास सिद्ध, संदीप शंकर चव्हाण, ऋतुराज विनायक इनामदार, अशी हल्लेखोर नावे आहेत.