कोल्हापूर जिल्ह्यातील आणखी एका बड्या राजकीय नेत्याला करोना व्हायरसची लागण झाली आहे. जिल्ह्यातील तीन आमदारांच्या पाठोपाठ आता एका खासदारालाही करोनाची लागण झाली आहे. कोल्हापूरचे शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांचा करोना तपासणीचा अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आला आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार संजय मंडलिक व त्यांच्या पत्नी आणि मुलगा वीरेंद्र मंडलिक यांचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील तीन आमदारांच्या पाठोपाठ खासदारही बाधित झाल्यामुळे चिंता वाढली आहे.

Kolhapur, Hatkanangle, election battle,
कोल्हापूर, हातकणंगलेत चुरस वाढली
vinay kore marathi news, dhairaysheel mane marathi news
वारणा समूहाची विश्वासार्हता दाखवून देताना धैर्यशील मानेंना विजयी करा; जनसुराज्यशक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा
Kolhapur Lok Sabha, Hasan Mushrif
कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली

यापूर्वी आमदार प्रकाश आवाडे, ऋतुराज पाटील व चंद्रकांत जाधव यांना करोनाची लागण झाली आहे. सध्या ऋतुराज पाटील आणि चंद्रकांत जाधव हे काँग्रेसचे आमदार तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल हे करोना उपचार घेत आहेत. तर, आमदार प्रकाश आवाडे यांनी करोनावर मात केली आहे.