इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून ‘एनआयए’ने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) आज (रविवार) पहाटे रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील दोघा सख्ख्या भावांची चौकशी चौकशी केली व नंतर त्यांना सोडून दिले. दरम्यान, दुपारी शेख यांच्या कार्यालयाची जमावाकडून तोडफोड करण्यात आली.

‘एनआयए’ने दहशतवादी विरोधी कारवाई विरोधात पहाटे देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले. चांदीनगरी हुपरी, रेंदाळ परिसरात चांदीचे दागिने तयार करण्याचा दोघा भावांचा व्यवसाय आहे. एका सामाजिक संघटनेच्या माध्यमातून ते कार्यरत होते.

चौकशी नंतर मुक्तता –

त्यांचा मुंबईशी इसिसशी संपर्क असल्याचा पथकाला संशय होता. त्यावरून अंबाबाई नगर परिसरातील त्यांच्या घरावर पहाटे साडेचार वाजता छापा टाकण्यात आला. त्यानंतर दोघा भावांची चौकशी करण्यात आली, शिवाय घराची झडती पाच तासाहून अधिक काळ सुरू होती. त्यानंतर दोघांना पथकाने चौकशी करून सोडून दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्यालयाची मोडतोड –

‘एनआयए’ने चौकशी केल्यानंतर रेंदाळ मध्ये तणावपूर्ण वातावरण बनले. या घटनेवरून संतप्त जमावाने शेख बंधूंच्या या कार्यालयाची मोडतोड देखील केली. घटनास्थळी हुपरी पोलीस पोहचले होते.