कोल्हापूर येथे आज (रविवार) महाआघाडीच्या पहिल्या प्रचारसभेआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्रित अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्याबरोबर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तसेच शिवसेना-भाजपाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. हे दोन्ही नेते महाआघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी कोल्हापूर येथे आले आहेत.

यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. ‘शिवसेना जिंदाबाद’, ‘महायुतीचा विजय असो’, ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’, अशा घोषणा कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने देत होते.