मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी राज्यात लाखाचे मोच्रे निघत असल्याची चर्चा जोरात असताना कोल्हापुरात १५ ऑक्टोबर रोजीच्या मोर्चासाठी दहा लाखांच्या वर मराठा समाज बांधव एकत्र येतील, असा वज्रनिर्धार रविवारी झालेल्या मराठा क्रांती मोर्चा नियोजन समितीच्या बठकीत व्यक्त करण्यात आला. आपआपसातील राजकीय मतभेद, गट, तट, पक्ष विसरून मराठा समाजाच्या स्वाभिमानासाठी एकत्र यावे. शाळा, महाविद्यालय, जिलतील सर्व व्यापार बंद ठेवून मोर्चत सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. शिव-शाहूंच्या करवीरनगरीची ताकद दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. करवीरनगरीचा मोर्चा इतरांना धडकी भरेल असा निघावा असे मत खासदार संभाजीराजे यांनी या बैठकीत व्यक्त केले.
मराठा समाजास आरक्षण, कोपर्डी घटनेतील पिडीत तरुणीस न्याय आदी मागण्यांसाठी शनिवारी (१५ ऑक्टोबर) रोजी भव्य मराठा क्रांती मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी लोकप्रतिनिधींची बठक रविवारी येथे पार पडली.
इतर कोणत्याही समाजाचे आरक्षण हिरावून आरक्षण नको आहे. मराठा समाजास हक्काचे आरक्षण पाहिजे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगून मोर्चासाठी ५ लाखांची मदत महाडिक उद्योग समूहातर्फे जाहीर केली. मराठा समाजास आरक्षणाचे काम हे घरचे कार्य आहे यामुळे कुणाला बोलविण्याची गरज नाही.
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी समाजातील जनता एकवटली असल्याने जनतेच्या मागून नेत्यांना यावेच लागेल असे मत समरजित घाटगे यांनी व्यक्त केले.
शाहू महाराजांनी दिले होते आरक्षण
छत्रपती शाहू महाराजांनी १९०२ आरक्षण दिले यामध्ये मराठा समाजालाही आरक्षण देण्यात आले होते. मराठा समाजासाठी राज्यभर मोच्रे निघत आहेत. कोल्हापुरात सर्वात शेवटी मोर्चा आहे. यामुळे शिव-शाहूंच्या करवीरनगरीची ताकद दाखवून देण्याची वेळ आता आली आहे. करवीरनगरीचा मोर्चा इतरांना धडकी भरेल असा निघावा असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले.
..तर हत्ती, घोडय़ावरून मिरवणूक
खासदार, आमदार यांनी भाषणादरम्यान मोर्चासाठी रोख स्वरूपात निधी जाहीर केला. प्रत्येकाकडून मोर्चासाठी निधी, तसेच वस्तू स्वरूपात मदत गोळा होत होती. यावर निवेदक राजू सावंत यांनी खासदार, आमदार यांनी सभागृहात मराठा आरक्षणाचा प्रश्न लावून धरावा. ही मागणी मान्य झाल्यानंतर समाज बांधवच तुमची हत्ती, घोडय़ावरून मिरवणूक काढतील असे सांगताच सभागृहात एक हशा पिकला.