कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची आज मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी निवड जाहीर केली. डॉ. शिर्के हे उद्या, शनिवारी (दि. १०) मुंबई विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डॉ. शिर्के यांना गेल्या ३५ वर्षांचा शैक्षणिक, संशोधकीय आणि प्रशासकीय अनुभव आहे. त्यांनी विद्यापीठाशी निगडित सर्व अधिकार मंडळांसह कुलसचिव, प्र-कुलगुरू पदे भूषविली आहेत. या निवडीबद्दल डॉ. शिर्के यांनी कुलपती श्री. कोश्यारी यांचे आभार मानले असून कुलपतींनी केलेली निवड सार्थ करण्याचा प्रयत्न राहील. त्याचप्रमाणे या कामगिरीला न्याय देण्यासाठी आपण या कार्यकाळात प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai university vice chancellor dr digambar shirke bhagat singh koshyari selection announced ysh
First published on: 09-09-2022 at 18:48 IST