पूर्वीच्या वादातून चाकूने वार करून सफाई कामगाराचा खून करण्यात आल्याचा प्रकार इचलकरंजी येथे घडला. राहुल बाबु दियालु (वय २२) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी सुशांत शिवाजी हाके (२५) सौरभ सचिन साळुंखे (२४) या दोघांना अटक केली आहे.
राहुल दियालु, सुशांत हाके व सौरभ साळुंखे हे तिघे मित्र आहेत. त्यांच्यात काही वर्षांपासून वाद निर्माण झाला होता. पूर्ववैमनस्यातून रविवारी मध्यरात्री तिघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यातून रागाच्या भरात हाके व साळुंखे यांनी दियालु याच्यावर चाकूने वार केले. गंभीर जखमी दियालु याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना तासाभरातच त्याचा मृत्यू झाला. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी भेट दिली.