कोल्हापूर : साडे तीन शक्तिपीठात समाविष्ट असलेल्या करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या शारदीय नवरात्रोत्सवास सोमवारी विधिवत प्रारंभ झाला. तोफेची सलामी देण्यात आल्यानंतर मंदिरात घटस्थापना करण्यात आली. देवीची पहिली पूजा ‘सिंहासनाधीश्वरी’ या रूपात साकारण्यात आली होती.  दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची लांबलचक रीघ लागली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवस्थान समिती व पोलिसांनी नेटके नियोजन केले असल्याने भाविकांना यंदा निर्बंधमुक्त दर्शनाचा लाभ घेता आल्याने त्यांच्यात आनंदाची लहर पसरली होती. श्रीपूजक शेखर मुनीश्वर यांच्या हस्ते घटस्थापना झाली. देवीच्या उत्सवमूर्तीवर मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांच्या हस्ते शासकीय अभिषेक झाला.भाविकांची गर्दी लक्षात घेवून अखंडितपणे दर्शन रांग सुरू राहणार असल्याचे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवाडे यांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri celebrations begin at mahalaxmi temple in kolhapur zws
First published on: 27-09-2022 at 04:23 IST