दुबई येथील नृत्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पसे पाठवतात मात्र पीडित महिलांना मदत करण्यासाठी असलेल्या मनोधर्य योजनेसाठी शासनाकडे पसे नाहीत. मुख्यमंत्री केवळ ट्वीटर मधून प्रत्येक घटनेला उत्तर देण्यात धन्यता मानतात मात्र त्यापेक्षा त्यांनी वास्तव समजावून घ्यावे, अशी टीका राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली. राष्ट्रवादीचा छमछमला विरोध असून या प्रकरणी आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला. प्रदेशाध्यक्षा वाघ जिल्हा दौऱ्यावर आल्या असताना पत्रकारांशी बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, की संघटना भक्कम करायची यासाठी राज्यभर दौरे सुरू आहेत. पक्षाचा अजेंडा प्रत्येक महिलेपर्यंत पोचवायचा आम्ही प्रयत्न करतो आहे. सध्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न भेडसावत आहे. या बाबत आम्ही गृहराज्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. मात्र त्यांचा दृष्टिकोन निकोप वाटला नाही, त्यांनी उलट आघाडीच्या काळात महिलांवर अत्याचार होत नव्हते का असा प्रश्न केला होता. हे उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित नव्हते. आघाडी सरकारने महिलांवरील अत्याचारांचे निराकरण करून आरोपींना शिक्षा दिली आहे. जनजागृतीसाठी मनोधर्य योजना आणली. मात्र युती सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले आहे हे त्यांच्या विचारांतून स्पष्ट होत आहे. या पुढे अत्याचार दिसेल त्या ठिकाणी जाऊन आम्ही काम करणार आहोत, झोपलेल्या युती शासनाला जागे करणार आहोत, असे त्या म्हणाल्या.
डान्स बारला आमचा विरोध आहे. या संदर्भात आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरुन आम्ही आंदोलन करू, असेही वाघ म्हणाल्या.
जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रवादी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत. त्यासाठी नवीन महिलांना संधी दिली जाईल तसेच जुन्यांना सोबत घेतले जाईल, असेही वाघ म्हणाल्या.