कोल्हापूर : कोल्हापुरात आज परशुराम जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. समस्त ब्राह्मण समाज आणि संस्थांच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी पेटाळा येथून श्री परशुराम पालखी मिरवणूक काढण्यात आली. या पालखीचे पुजन पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांच्या हस्ते आणि ब्रह्मवृदांच्या मंत्रोपचारात करण्यात आले. ब्राह्मण समाजातील सुमारे ३ हजार बंधु-भगिनी या सोहळ्यात सहभागी झाले होते.

मिरवणूकीच्या अग्रभागी पारंपारिक वेशभुषा, भगव्या टोप्या वस्त्र परिधान करुन बंधुभगिनी सहभागी झाले होते. त्यानंतर तरुणांची दुचाकी रॅली, पारंपरिक वाद्याचे पथक, चित्ररथ, लेझीम पथक, वारकरी मंडळाचे पथक अग्रभागी होते. श्रींच्या पालखीपुढे सतत मंत्रोपचार करणारे पुरोहीत पायी चालत होते.

हेही वाचा…कोल्हापूरात महालक्ष्मी देवीचा हिंदोळा पूजा सोहळा मंगलमय वातावरणात पार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालखी मिरवणूक खरी कॉर्नर, बिनखांबी गणेश मंदीर, ताराबाई रोड, निवृत्ती चौक मार्गे पुन्हा पेटाळा मैदान येथे पोहोचली. यावेळी भगवान परशुरामांचा जयघोष करण्यात आला सायंकाळी ६.५५ वाजता मुहूर्तावर श्रींचा पाळणा सोहळा, सुंठवडा वाटप करण्यात आले. पौरोहीत्य प्रसाद निगुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. दरम्यान, समस्त ब्राह्मण समाजातर्फे कत्यायनी येथील श्री परशुराम मंदीरा तसेच कोल्हापूर चित्पावन संघामध्येही श्री परशुराम मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.