बार्शी तालुक्यातील झरेगाव शिवारात सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या नऊजणांच्या टोळीला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीत चार महिलांचाही समावेश आहे.आकाश यशवंत भोसले, हाच्या ऊर्फ पप्प्या शहाजी भोसले (रा. लाडोळे, ता. बार्शी), जयश्री बाबलिंग्या भोसले, विजय बाबलिंग्या भोसले, ज्योत्स्ना विजय भोसले, रागिणी राहुल शिंदे (चौघे रा. झरेगाव, ता. बार्शी), श्रावण्या जामन शिंदे, नंदिनी निळ्या शिंदे व निळ्या जामन शिंदे (तिघे रा. उस्मानाबाद)अशी या टोळीतील संशयितांची नावे आहेत. हे सर्वजण मध्यरात्रीच्या सुमारास झरेगावाच्या शिवारात रोपा देवी नावाने ओळखल्या जाणाऱ्या रस्त्यावर मोटारसायकलींसह वेगवेगळी हत्यारे घेऊन थांबले होते. एखाद्या ठिकाणी सशस्त्र दरोडा घालण्याचा त्यांचा हेतू होता, असा सोलापूर ग्रामीण पोलिसांचा दावा आहे. वैराग पोलीस ठाण्यात या टोळीविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असून सर्वाना अटक करण्यात आली आहे.
सहा आसनी रिक्षाला अपघात
मोहोळ तालुक्यातील पापरी गावाकडे निघालेल्या सहा आसनी रिक्षाला अपघात होऊन त्यात वैजनाथ श्रीपती वाघमारे (६५, रा. पापरी) या वृध्द प्रवाशाचा मृत्यू झाला. तर अन्य प्रवासी जखमी झाले. रिक्षा भरधाव वेगाने जात असताना अचाककणे उलटली झाली आणि हा अपघात झाला. रिक्षाचालक चंद्रकांत निवृत्ती भाकरे (रा. पापरी) याच्या विरूध्द मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 14th Feb 2016 रोजी प्रकाशित
सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीतील टोळीला अटक
बार्शी तालुक्यातील झरेगाव शिवारात सशस्त्र दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या नऊजणांच्या टोळीला सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. या टोळीत चार महिलांचाही समावेश आहे.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 14-02-2016 at 01:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery gang arrested in solapur