आमीरखान काय म्हणाला, त्या पेक्षाही मला शहीद संतोष महाडिक यांच्या कुटुंबीयांचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो, असे सांगत शरद पवार यांनी आमीरखानने उपस्थित केलेल्या मुद्दय़ाला बगल दिली.
शहीद संतोष महाडिक यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी पवार आज सातारा दौऱ्यावर आले होते. या वेळी महाडीक कुटुंबीयांचे सांत्वन करत असतानाच काही पत्रकारांनी त्यांना, आमीरखानने देश सोडून जाण्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल विचारले, यावर पवार उद्विग्नपणे म्हणाले, ‘आमीरचं सोडा, शहीद संतोष महाडिक देशासाठी महत्त्वाचे आहेत. तो काय म्हणाला या पेक्षाही मला महाडिक कुटुंबीयांचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात,’ असे उत्तर दिले. तसेच या प्रश्नावर अधिक बोलण्यास नकार दिला.
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2015 रोजी प्रकाशित
आमीरखानपेक्षा महाडिकांचा प्रश्न महत्त्वाचा- शरद पवार
आमीरखान काय म्हणाला, त्या पेक्षाही मला शहीद संतोष महाडिक यांच्या कुटुंबीयांचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो

First published on: 25-11-2015 at 03:27 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Santosh mahadik important question family amirakhan