कोल्हापूर : कोठे रथातून मिरवणूक कोठे रेल्वे गाडीतून सफर अशा अनोख्या वातावरणामध्ये नवागत बालकांचे शनिवारी शाळेमध्ये स्वागत करण्यात आले. सुगंधी गुलाब पुष्पासह मिठाई आणि पुस्तके मिळाल्याने मुलांच्या दृष्टीने शाळेचा पहिला दिवस आनंददायी ठरला.

मे महिन्याची सुट्टी संपल्यानंतर आज शाळेचा पहिला दिवस होता. शाळेत पहिल्यांदाच प्रवेश करणाऱ्या मुलांसाठी हा दिवस संस्मरणीय ठरावा यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे नियोजन करण्यात आले होते. कोल्हापुरात खेळण्याच्या रेल्वेतून बसून मुलांची मिरवणूक काढण्यात आली. रंकाळा परिसरामध्ये यामुळे मुले आनंदी झाली.

हेही वाचा – इचलकरंजीत काळ्या ओढ्यावर ‘सीईटीपी’च्या जलवाहिनीस गळती; मल्लनिसारण जलवाहिनी फुटल्याने मैला पंचगंगेत

कोल्हापुरात अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, साधना पाटील, प्रशासन अधिकारी शंकर यादव यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मिकी माऊस आल्याने त्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही, असे शिक्षक विनोदकुमार बोंग यांनी सांगितले. अनेक शाळांमध्ये लाडू देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

हेही वाच – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा कोल्हापुरातील १०० कोटी रस्ते कामाबाबतचा दावा फसवा; रस्त्यांची कामे अर्धवट, ‘आप’चा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इचलकरंजीतील विद्यानिकेतन केंद्र शाळेत रथातून मिरवणूक काढण्यात आली. या शाळेत दोनशेहून अधिक मुले दाखल झाली. मुलांचे प्रशासन अधिकारी इरफान पटेल, मुख्याध्यापिका अलका शेलार यांनी स्वागत केले.