|| दयानंद लिपारे

निवडणूक आयोगाला वेगळा चेहरा देणारे देशाचे माजी निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांनी केलेली निवडणूक बदलातील अत्यंत महत्त्वपूर्ण प्रकिया म्हणून निवडणूक ओळखपत्राकडे पाहिले जाते. २५ वर्षांपूर्वी त्यांनी घेतलेला हा धाडसी निर्णय प्राथमिक अवस्थेत असलेल्या साधन सामग्रीसह पूर्ण करणे हे आव्हान होते. कोल्हापुर जिल्ह्यत सुमारे १२ लाख मतदारांसाठी मतदार ओळखपत्र बनवण्याची प्रक्रिया या तीन एजन्सीनी नेटकेपणाने पार पाडली होती. अतिशय कमी वेळेत या प्रक्रियेच्या कटू-गोड आठवणीं प्रक्रि येत राबलेल्या मान्यवरांच्या अनुभव कथनातून व्यक्त झाली.

मतदानातील गैरप्रकारांना आवर घालण्याच्या उद्देशाने मतदार ओळखपत्राची सक्ती शेषन यांनी केली होती. त्यासाठी त्यांनी विशेष मोहीम राबविली असता त्यातील कोल्हापूरचा अनुभव हा खूपच वरच्या दर्जाचा होता. ९८ टक्के मतदारांचे मतदान ओळखपत्र बनवण्याची कामगिरी करून कोल्हापूरने देशात पहिला Rमांक मिळवला होता, असे ‘फोरसाइट’ या एजन्सीचे चालक सुभाष नियोगी यांनी सांगितले.

१९९४ साली निवडणूक ओळखपत्र बनवण्यासाठी देशव्यापी जिल्हानिहाय निविदा प्रसिद्ध केल्या. कोल्हापूर जिल्ह्यत फोरसाईटकडे ६ विधानसभा मतदारसंघ, चेतन एंटरप्राइजकडे ५, तर फिक्सो फोटोकडे एका मतदारसंघाची जबाबदारी दिली होती.१ सप्टेंबर रोजी सुरु झालेले काम तीन महिन्यात संपवायचे असल्याने कामाचा एकच  झपाटा सुरु राहिला.

तत्कालीन जिल्हाधिकारी अजित जैन यांच्या कार्यकाळात कामाला सुरुवात झाली, नंतर राहुल अस्थाना या जिल्हाधिकारम्य़ांनी कामाला गती दिली. याचे काम शिवाजी स्टेडियम मध्ये चालायचे, नंतर आताच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत २४ तास काम सुरु असायचे. जिल्हाधिकारी अस्थाना पहाटे तीन वाजता येऊ न काम सुरु आहे का याचा अंदाज घ्यायचे.

मतदान केंद्रात मतदार आल्यावर त्याचे नाव, वय, मतदान केंद्र असा तपशील असलेली पाटी हाती देऊ न त्याचे काही मिनिटांचे चलतचित्रीकरण (व्हीडिओ शूटिंग)  केले जात असे. पाटी घेऊ न उभे राहण्यास काही लोकांचा विरोध असे. आम्हाला आरोपी ठरवत आहात का ? अशी विचारणा ते करीत. त्यांची समजूत काढून चित्रीकरण केले जात असे. या प्रतिमांच्या कॅसेट मधील उत्तम प्रतिमा निवडून छायाचित्र बनवले जाई. छायाचित्र कागदावर चिकटवणे, त्यावर निवडणूक विभागाचा शिक्का मारून त्यास सील लावून त्याचे लॅमिनेशन केली जाई. ही प्रक्रिया  करण्याचा अनुभव कोणालाच नव्हता. या प्रRियेसाठी शंभरावर व्हिडीओ विकत घेतले गेले. तितक्या ऑपरेटर तरुणांना काम मिळाले. आयात केलेली कॅसेट वापरावी लागत असे, तिचा पुरवठा कमी झाल्याने किंमत दुप्पट झाली. संगणक ऑपरेटर, डेटा एंट्री ऑपरेटर असे नव्या काळाशी सुसंगत ठरणारे तंत्रज्ञ तयार झाले. ओळखपत्रावर चुकीचा क्रमांक नोंदला गेल्याने अनेकदा वादाचे प्रसंग उद्धभवले होते.

शेषन यांच्याकडून आढावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याच कामासाठी शेषन रत्नागिरी येथे आले होते. कोल्हापूरचा तपशील मिळण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी अस्थाना यांना दूरध्वनीवरून संपर्क केला. शेषन यांना बोलायचे आहे असा निरोप मिळाल्यावर अस्थाना शिवाजी स्टेडियम पासून नियोगी यांच्या कार्यालयात धावतच आले. त्यांनी सर्व माहिती दिल्यावर शेषन यांनी समाधान आणि कौतुक केल्यावर उपस्थित सर्वानाच आनंद झाला.