Shiv Sena office changed Characters Modi Ingwale Surve ysh 95 | Loksatta

शिवसेना पदाधिकारी बदलले; मोदी, इंगवले, सुर्वे यांची वर्णी

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मातोश्रीवरून पक्ष बांधणीसाठी नव्याने सूत्रे हलत आहेत.

शिवसेना पदाधिकारी बदलले; मोदी, इंगवले, सुर्वे यांची वर्णी
सुनील मोदी, रविकिरण इंगवले, हर्षल सुर्वे

कोल्हापूर : शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर मातोश्रीवरून पक्ष बांधणीसाठी नव्याने सूत्रे हलत आहेत. कोल्हापूर शहरात नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. कोल्हापूर जिल्ह्यातून राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आबिटकर , राजेश क्षीरसागर यांनी शिंदे गटासोबत राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे कोल्हापुरात शिवसेनेला जबर धक्का बसला.

यानंतर शिवसेनेने नव्याने पक्ष बांधणी सुरू केली आहे. यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी महापालिकेचे माजी स्थायी समिती सभापती सुनील मोदी, दक्षिण मतदार संघासाठी माजी उपमहापौर रवीकिरण इंगवले, तर शहर समन्वयक म्हणून हर्षल सुर्वे यांचे नियुक्ती केली आहे. अवधूत साळुंखे, पोपट दांगट हे उपजिल्हाप्रमुख असतील. तर प्रीती क्षीरसागर, प्रतिज्ञा उत्तरे यांच्याकडे शहर संघटकची जबाबदारी देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-07-2022 at 14:52 IST
Next Story
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोल्हापूर जिल्ह्याच्या पूरपरिस्थितीचा आढावा; कोल्हापूर जिल्ह्यात पूर व्यवस्थापन आढावा बैठक; सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन