कोल्हापूर : राज्याचे नवे राज्याचे नवीन सरकार धोरण राखण्यासाठी राज्य शासनाने एका निर्णयाद्वारे शुक्रवारी एका व्यापक समितीची स्थापना केली आहे. १७ जणांच्या या समितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सहकाराशी निगडित तिघ अभ्यासकांची वर्णी लागली आहे. सहकार विभागातील सेवानिवृत्त अपर आयुक्त दिनेश ओऊळकर, डीकेटीई वस्त्रोद्योग अभियांत्रिकी महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. सी. डी. काणे व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉ. चेतन नरके यांचा त्यामध्ये समावेश आहे.

केंद्र सरकार मध्ये अलीकडेच सहकार खात्याची निर्मिती करण्यात आली आहे असून त्याची पहिली जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांनी माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून राष्ट्रीय सहकार धोरण बनवण्याची जबाबदारी दिली होती.  प्रभू यांनी सहकारातून समृद्धी हीच या संकल्पनेवर केंद्र शासनाकडे अहवाल सादर केला आहे.

lok sabha 2024, Vijay Wadettiwar Alleged BJP Entry, Dharmarao Baba Aatram , Chandrasekhar Bawankule , gadchiroli lok sabha seat, election 2024, Dharmarao Baba Aatram alleges Vijay Wadettiwar, congress, bjp, ajit pawar ncp, gadchiroli news, marathi news
“विजय वडेट्टीवार यांना मंत्रिपदाच्या काळातही भाजपात येण्याची घाई झाली होती…” धर्मरावबाबा आत्राम यांचा गौप्यस्फोट; म्हणाले, “त्या बैठकीत मी…”
Mallikarjun Kharge criticizes Dalit oppression in Narendra Modi Maharashtra state
मोदींच्या राज्यात दलितांवर अत्याचार; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
Satej Patil criticize Sanjay Mandlik says MPs do not meet even for a simple letter
साध्या पत्रासाठीही खासदार भेटत नाहीत; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका
Shahu Maharaj
शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार

हेही वाचा >>> शरीरसंबंधास नकार दिल्याने महिलेची हत्या, नंतर उसाच्या फडाला लावली आग; कोल्हापुरातील धक्कादायक प्रकार उजेडात!

या अनुषंगाने राज्याच्या सहकार धोरणात अनुषंगिक बदल करण्याच्या दृष्टीने राज्यातील सहकार क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची समिती स्थापन करण्याचा निर्णय आज सहकार विभागाने घेतला आहे. सहकार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या १७ जणांच्या या समितीमध्ये कोल्हापुरशी निगडित तिघांचा समावेश आहे.

या निवडीनंतर बोलताना दिनेश ओऊळकर म्हणाले, सुरेश प्रभू यांनी केंद्र शासनाकडे अतिशय चांगला अहवाल केला आहे. त्या अनुषंगाने सहकारात प्रगल्भ असलेले महाराष्ट्र राज्याचे नवे धोरण ठरवताना नव्या पिढीचा समावेश वाढववलागेल. डॉ. काणे म्हणाले, सहकारात क्षेत्राला जाणवर्य अडचणींचा अभयस करून त्या दूर करण्यासाठी कालसुसंगत धोरण ठरवावे लागेल असे दिसते.

तरुणाईला संधी राज्यव्यापी या समितीमध्ये सहकारातील वरिष्ठ अधिकारी आणि अनुभवी अभ्यासकांचा समावेश आहे. याचबरोबर डॉ. चेतन नरके यांच्या रूपाने तरुणाईला संधी देण्यात आल्याचे दिसते. सहकार क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कोल्हापूर कडे थायलंडचे आर्थिक सल्लागार असलेले नरके यांना तुलनेने कमी वयात संधी मिळणे ही उल्लेखनीय गोष्ट ठरली आहे. सहकारातील कालबाह्य बाबी बदलून खाजगी क्षेत्राशी सक्षमपणे सामना करून अस्तित्व टिकेल अशा नव्या सहकार धोरणाची अपेक्षानरके  व्यक्त करतात.