कामगार नेते गोविंदराव पानसरे हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने दोन नवीन साक्षीदार पुढे आले असून त्यांचे जबाब बुधवारी सुनावणीवेळी न्यायालयात सादर केले. दाभोलकर हत्येप्रकरणातील प्रमुख साक्षीदार संजय साडविलकर याचाही जबाब एसआयटीने नोंदविला असून तोही न्यायालयात सादर केल्याने दाभोलकर, पानसरे यांच्या हत्येमध्ये साम्य असल्याच्या तपास यंत्रणांच्या संशयास बळकटी मिळाली आहे.

पानसरे हत्येचा तपास करणाऱ्या एसआयटीने शैलेंद्र दिगंबर मोरे (वय ३९, रा. तोरणा हौसिंग सोसायटी) या मीठ व्यावसायिकांचा जबाब १४ जुल रोजी नोंदविला आहे. तर संजय अरुण साडविलकर (रा. साकोली कॉर्नर) यांचा जबाब १५ जुल रोजी नोंदविला. या दोघांचेही जबाब प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवून घेतले आहेत. हे जबाब बंद लिफाफ्यातून न्यायालयात सादर केला. दरम्यान उच्च न्यायालयातील चार्जफ्रेमची सुनावणी ११ ऑगस्ट पर्यंत पुढे ढकलण्यात आली असल्याने जिल्हा न्यायालयातील सुनावणी तहकूब करावी, अशी मागणी सरकारी वकील अ‍ॅड. चंद्रकांत बुधले यांनी केली. यावर जिल्हा सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी पुढील सुनावणी १२ ऑगस्ट रोजी होणार असल्याचे सांगितले.

समीरचे वकील अ‍ॅड. पटवर्धन यांनी समीरला कारागृहात ३ ते ५ या अतिरिक्त वेळेत अंडा सेलमधून बाहेर फिरण्याची मुभा न्यायालयाने दिली होती. प्रभारी कारागृह अधीक्षक आवळे यांनी ही मुभा बंद केली आहे. यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला असल्याची तक्रार समीरच्यावतीने न्यायालयात केली. यावर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांनी याबाबत चौकशी करण्यात येईल. चौकशीअंती न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येमागे एकच मास्टरमाइंड असल्याचा संशय तपास यंत्रणांना होता. दाभोलकर हत्याप्रकरणातील सीबीआयचा प्रमुख साक्षीदार संजय साडविलकर याचा जबाब पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीने नोंदवून घेतल्याने दोनही हत्यामागील सूत्रधार एकच असावा याला बळकटी मिळाली आहे.