कोल्हापूर : विनायक राऊत जेथे जातील त्या ठिकाणी पैसे घेतल्याशिवाय जात नाहीत. निवडणुका असो किंवा कोणताही कार्यक्रम असू दे, त्यांची बॅग तयार ठेवायला लागते, असा गंभीर आरोप माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी केला आहे. शिवसेनेचे सचिव, खासदार विनायक राऊत  यांनी कालच्या शिवसेना मेळाव्यात राजेश क्षीरसागर यांच्यावर टीका केली होती. राऊत यांच्यावर पलटवार करताना  क्षीरसागर म्हणाले,की दुसऱ्यांचे ऐकून माझ्यावर ते चुकीचे आरोप करत असतील, तर शिवसेना संपवण्याचे कंत्राट राऊत यांनी घेतले आहे हेच स्पष्ट होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खासदार शिंदे गटाबरोबर?

या वेळी क्षीरसागर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील संजय मंडलिक आणि  धैर्यशील माने  हे दोन्ही खासदार लवकरच बंडखोर शिंदे गटात दिसतील, असा दावा केला आहे. कालच्या शिवसेना मेळाव्याला हे दोन्ही खासदार अनुपस्थित होते. मंडलिक यांनी दिल्लीत असल्याचे तर माने यांनी तब्येत बरी नसल्याने उपस्थित नसल्याचा खुलासा करण्यात आला होता.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vinayak raut doesnt go anywhere money kshirsagar elections program ysh
First published on: 17-07-2022 at 00:02 IST