कोल्हापूर महानगरपालिका महिला बाल कल्याण समिती आणि डॉ. डी. वाय. पाटील कला, क्रीडा, शैक्षणिक व सांस्कृतिक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा महिला दिनाच्या निमित्ताने ८-९ मार्च रोजी ‘जागर स्त्री शक्तीचा’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमांतर्गत बाईक रॅली, वॉकेथॉन, मिस गृहिणी स्पर्धा तसेच लोकप्रिय लावणी असे विविध उपक्रम होणार आहेत. दरम्यान केशवराव भोसले नाटय़गृहात या कार्यक्रमातील विविध स्पर्धाचे बक्षीस वितरण प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री िडपल कपाडिया यांच्या हस्ते होणार आहे. प्रतिमा पाटील यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली. यामध्ये ८ मार्च रोजी सकाळी गांधी मदान येथून ‘वॉकेथॉन’ला सुरुवात होणार आहे. यामध्ये महिलांना गटाने अथवा वैयक्तिकरीत्या सहभागी होता येईल. सहभागी होणाऱ्या महिला, युवतींना तसेच त्यांच्या गटांना उत्कृष्ट पारंपरिक वेषभूषा करणाऱ्या गटांना  २५ हजार,  २० हजार व १० हजार आणि स्मृतिचिन्ह अशी बक्षिसे आहेत. बुधवारी युवती तसेच महिलांसाठी ग्रुप डान्स, फॅशन शो, मिसेस गृहिणी, मिस युवती स्पर्धा होणार आहे. ‘मिसेस गृहिणी’ला मोपेड बक्षीस मिळणार आहे. कार्यक्रमात सहभागासाठी नोंदणी आवश्यक आहे.