सनरायजर्स हैद्राबादने आयपीएलच्या ११व्या मोसमातील ईडन गार्डन्स स्टेडिअममध्ये शनिवारी झालेल्या १०व्या सामन्यात यजमान संघ कोलकाता नाईटरायडर्सवर पाच गडी राखून विजय मिळवला.
A solid victory for the @SunRisers as they beat #KKR by 5 wickets at the Eden Gardens.#KKRvSRH #VIVOIPL pic.twitter.com/uoa81zEJxd
— IndianPremierLeague (@IPL) April 14, 2018
हैद्राबादकडून केन विलियमसनने कर्णधाराला साजिशी खेळी खेळून अर्धशतक ठोकले. १३९ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हैद्राबादच्या संघासाठी रिद्धिमान साहाने स्फोटक खेळीने सुरुवात केली. त्यानंतर सुनील नरेनच्या चेंडूला साहा ओळखू शकला नाही आणि तो बाद झाला. साहानंतर धवननही ७ धावा करीत नरेनच्या चेंडूवर बोल्ड झाला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या मनीष पांडेला कुलदीप यादवने टिपले. यापूर्वी हैद्राबादच्या गोलंदाजांनी ईडन गार्डन्स स्टेडिअममध्ये शानदार प्रदर्शन करीत कोलकाताच्या संघाला १३८ धावांवर रोखण्याचे काम केले होते.
नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीला आलेल्या कोलकाताने २० षटकांत ८ बळींच्या बदल्यात १३८ धावा केल्या होत्या. कोलकाताची सुरुवात खराब झाली तसेच सलामीला आलेला फलंदाज रॉबिन उथप्पा केवळ ३ धावा करीत तंबूत परतला. त्यानंतर पावसामुळे खेळ काही काळ थांबवावा लागला. पाऊस थांबल्यानंतर सामना पुन्हा सुरु झाला त्यावेळी पहिल्याच षटकात नितीश राणा १८ धावा करीत बाद झाला. त्यानंतर आलेल्या सुनील नरेन ९ आंद्रे रसेल काही खास कामगिरी करु शकला नाही. दरम्यान, ख्रिस लिनने ३४ चेंडूंमध्ये ४९ धावा करीत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 15, 2018 8:57 am