ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघात निवड समितीने वन-डे आणि टी-२० संघात ऋषभ पंतला संधी दिली नाही. कसोटी मालिकेसाठी ऋषभला भारतीय संघात स्थान मिळालेलं असलं तरीही ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या तीन दिवसीय सराव सामन्यात पंतला संधी नाकारण्यात आली. ज्यामुळे कसोटी मालिकेतही टीम इंडियाचं मॅनेजमेंट पंतला संधी देईल का?? अशी शंका यायला लागली आहे. धोनीचा उत्तराधिकारी म्हणून संघात स्थान मिळालेल्या पंतला संघात आपलं स्थान कायम राखता आलं नाही. लोकेश राहुल सध्या वन-डे आणि टी-२० सामन्यात यष्टीरक्षण करतो आहे. परंतू या परिस्थितीसाठी स्वतः पंतच जबाबदार असल्याचं मत माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने व्यक्त केलं.

आणखी वाचा- सूर्यकुमारला भारत सोडावा लागणार नाही, BCCI त्याच्या पाठीशी ! पाक खेळाडूने PCB ला फटकारलं

“जरा या गोष्टीचा विचार करुन बघा, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत आणि रविंद्र जाडेजा हे फलंदाज भारतीय संघात पाचव्या, सहाव्या आणि सातव्या स्थानावर खेळले….तर ते चित्र पाहून तुम्हालाही वाटेल की आपला संघ किती स्ट्राँग आहे. पण मग प्रश्न असा निर्माण होतो की ऋषभ पंतने स्वतःला सिद्ध केलं आहे का?? खरंतर हा प्रश्न पंतने स्वतःला विचारायला हवा. ऋषभ पंतला हे समजायला हवं की ज्यावेळी त्याला संधी मिळाली त्यावेळी तो अपयशी ठरला आहे. विचीत्र पद्धतीने बाद होणं असो किंवा गरज असताना मोठी खेळी न करणं…आणि या घडीला संघातून स्थान गमावण्याबद्दल ऋषभने स्वतःलाच दोषी मानायला हवं.” आकाश चोप्रा Cricbuzz ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होता.

Video : श्रेयसचा तो षटकार पाहून विराट कोहलीही झाला अचंबित

पहिल्या सराव सामन्यात भारतीय संघाने अनुभवी साहाला यष्टीरक्षणाची संधी दिली. त्यामुळे कसोटी मालिकेतही टीम इंडियाचं मॅनेजमेंट फॉर्मात नसलेल्या पंतऐवजी साहाच्या अनुभवाला पसंती देईल असे संकेत मिळतायत. त्यामुळे ऋषभ पंतला पुन्हा संघात आपलं स्थान पक्क करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार असल्याचंही आकाश चोप्रा म्हणाला.