सध्या करोनाची दहशत सर्व जगभरात आहे. करोनाच्या तडाख्यामुळे बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. स्वत: क्रिकेटपटू देखील घरात बसून सोशल मीडियावरून चाहत्यांशी संवाद साधत आहेत. आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डीव्हिलियर्स याने प्रसिद्ध समालोचक पॉमी बांग्वा याच्याशी इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला.

रोहित म्हणतो, “करोनाच्या तडाख्यात सकारात्मक गोष्ट म्हणजे…”

पॉमी बांग्वाने या मुलाखतीत एबी डीव्हिलियर्सला अनेक प्रश्न विचारले. या दरम्यान, एका चाहत्याने कमेंटमध्ये डीव्हिलियर्सला CSK संघाकडून खेळशील का? असा प्रश्न विचारला. याच प्रश्न मग पॉमी बांग्वानेदेखील डीव्हिलियर्सला विचारला. त्यावर उत्तर देताना डीव्हिलियर्स म्हणाला, “IPL च्या यंत्रणेमुळे मला माझा संघ निवडण्याची संधी कधीच मिळालेली नाही. मी आधी दिल्ली संघाकडून खेळलो. त्यांनी तीन वर्षांनंतर मला करारमुक्त केलं, तेव्हा मला बंगळुरू संघाने विकत घेतलं. IPL मधील आपलं करिअर कोणत्या संघामार्फत घडेल हे आपल्या हातात नसतं. त्यामुळे मला वाटत नाही की CSK संघाकडून मला खेळायला मिळेल. पण त्यांच्याविरोधात खेळायला मला नेहमीच आवडतं कारण तो एक उत्तम संघ आहे.”

जेव्हा कपिल देव-दाऊद ड्रेसिंग रूममध्ये आमने-सामने येतात…

“विराट म्हणजे क्रिकेटचा रॉजर फेडरर”

“विराट फलंदाजी करत असताना त्याची फटकेबाजी अत्यंत नैसर्गिक असल्यासारखी वाटते. तो या बाबतीत टेनिसपटू रॉजर फेडररसारखा आहे. याउलट स्टीव्ह स्मिथ मात्र राफेल नदालसारखा आहे. तो मानसिकदृष्ट्या खूप भक्कम आहे. स्मिथ धावा जमवण्याचं तंत्र शोधून काढतो, पण त्याची फटकेबाजी तितकीशी सहज आणि नैसर्गिक वाटत नाही. स्मिथने अनेक विक्रम मोडले असले, तरी विराटने सर्वत्र जाऊन दमदार खेळ करून दाखवला आहे, त्यामुळे मला विराटची खेळी अधिक आवडते”, असे डीव्हिलियर्स म्हणाला.