01 March 2021

News Flash

Video : ऐतिहासिक विजयानंतर अफगाणिस्तानमध्ये चिमुरड्यांचा जल्लोष

अफगाणिस्तानने बांगलादेशला दिली २२४ धावांनी मात

बांगलादेशविरूद्ध झालेल्या एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानने यजमानांवर २२४ धावांनी विजय मिळवला. कसोटी संघाचा दर्जा मिळाल्यानंतर हा अफगाणिस्तानचा दुसरा विजय ठरला. या विजयासह कसोटी क्रिकेटचा दर्जा मिळाल्यापासून सर्वात कमी कालावधीत दुसरा कसोटी विजय मिळवण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाशी अफगाणिस्तानने बरोबरी केली. बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांच्यात झालेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा संघ सरस ठरला. ३९८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशला केवळ १७३ धावाच करता आल्या.

कसोटी कारकिर्दीतील सर्वात तरूण कर्णधार ठरलेल्या रशीद खानने सामन्यात अर्धशतक ठोकले आणि आपल्या फिरकीच्या जाळ्यात ११ गड्यांना अडकवले. त्यासोबत त्याने पहिल्या डावात अर्धशतकी खेळीही केली. त्याच्या या कामगिरीच्या बळावर त्याने अफगाणिस्तानला विजय मिळवून दिला. कर्णधार म्हणून खेळताना पहिल्यावहिल्या सामन्यातच अशी कामगिरी करणारा रशीद पहिलाच खेळाडू ठरला. या विजयानंतर अफगाणिस्तानमध्ये चिमुरड्यांनी एकच जल्लोष केला.

अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाचे विशेष कार्यकारी अधिकारी स्टनिकझाई यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.  या ट्विटमध्ये त्यांनी कर्णधार रशीद खान आणि शेवटचा कसोटी सामना खेळणारा मोहम्मद नबी या दोघांची स्तुती केली. तसेच, आमचा संघ जिंकल्यावर आमचे नागरिक अशा पद्धतीचा जल्लोष करत विजय साजरा करतात, असेही त्यांनी लिहीले आहे.

दरम्यान, नाणेफेक जिंकून अफगाणिस्तानच्या संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि ३४२ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करता बांगलादेशच्या संघाने पहिल्या डावात केवळ २०५ धावा केल्या. ही आघाडी पुढे नेत अफगाणिस्तानने दुसऱ्या डावात २६० धावा केल्या आणि बांगलादेशला विजयासाठी ३९८ धावांचे लक्ष्य दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना शादमान इस्लाम (४१) आणि शाकिब अल हसन (४४) या दोघांनी काही काळ झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण सामना संपण्यासाठी अवघी २ षटके शिल्लक असताना अफगाणिस्तानने बांगलादेशचा शेवटचा गडी टिपला आणि सामना खिशात घातला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2019 5:12 pm

Web Title: afghanistan kids enjoy test victory vs bangladesh vjb 91
Next Stories
1 पवारांच्या बारामतीत रंगणार क्रिकेटची रणधुमाळी
2 …म्हणून आफ्रिकेविरुद्ध मालिकेत कुलदीप-चहलला भारतीय संघात स्थान नाही !
3 संघात प्रवेश हवाय मग हे आव्हान पार पाडाच !
Just Now!
X