News Flash

अजिंक्यला कांगारुचा केक कापण्यास सांगितलं मात्र…; ही बातमी वाचून तुम्हालाही वाटेल रहाणेचा अभिमान

बातमी वाचून तुम्हीही 'एक ही तो दिल है, कितनी बार जीतोगे', असंच म्हणाल

‘आला रे आला, अजिंक्य आला…’ या घोषणांसह ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत धूळ चारल्यानंतर मायदेशी परलेला भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेचे गुरुवारी जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ब्रिस्बेन येथे झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं तीन गड्यांनी कांगारुंचा पराभव करत बॉर्डर-गावसकर मालिका २-१ नं जिंकली. विशेषत: प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थइतीत आणि पहिल्या कसोटीतील दारुण पराभवानंतरही भारताने मालिका जिंकण्याचा पराक्रम केल्यामुळे रहाणेसह विजयीवीरांवर चोहोबाजूनं कौतुकाचा वर्षाव होत आहे. रहाणेसह रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, शार्दूल ठाकूर आणि रवी शास्त्री यांदेची गुरुवारी मुंबई विमानतळावर स्वागत करण्यात आले.

कर्णधार अजिंक्य रहाणेचे माटुंहा येथील राहत्या घरी आधिक जल्लोषात तसेच पारंपारक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरात स्वागत झाले. पुष्पांचा वर्षाव करण्याबरोबरच राहणेच्या नावाने विविध घोषणा यावेळी देण्यात आल्या.. रहाणेसाठी आणि त्याच्या सोसायटीतील शेजाऱ्यांसाठी हा सुवर्णक्षण होता. रहाणेच्या स्वगातासटी सोसायटीमधील काही लोकांनी केक कटिंगचं आयोजन केलं होतं. त्यासाठी कांगारुची प्रतिकृती असलेला केक मागवण्यात आला. कांगारुंचा पराभव केल्याने केकवर कांगारुची प्रतिकृती साकारण्यात आली. रहाणेला स्वागतानंतर हा केक कापण्याची विनंती करण्यात आली. मात्र रहाणेने आपल्यातील खिलाडूवृत्ती दाखवून दिली. कांगारु ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी आहे. यामुळे रहाणेने कांगारुच्या प्रतिकृतीचा केक कापाण्यास नकार दिला. या कृतीमुळे रहाणेचं पुन्हा एकदा कौतुक केलं गेलं.

पाहा व्हिडीओ –

रहाणेच्या या कृतीनंतर सर्वांची मन जिंकली आहेत. मैदाबाहेरील रहाणेने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचं दर्शन पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे. काहींनी तर रहाणेचं कौतुक करताना ‘एक ही तो दिल है, कितनी बार जीतोगे’ असं म्हटलं आहे.

आणखी वाचा –

असं असेल इंग्लंडच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक

हार्दिक, इशांतचं पुनरागमन; इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची निवड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2021 9:47 am

Web Title: ajinkya rahane wins the internet by refusing to cut a cake with kangaroo on top nck 90
Next Stories
1 नटराजनच्या स्वागताला रथ; सेहवागने शेअर केलेला स्वागताचा Video बघाच
2 ‘सुंदर’ सरप्राइज… गुगलवर Indian Cricket Team असं टाइप तर करुन बघा
3 IPL 2021 : राजस्थानचा ‘हा’ धडाकेबाज फलंदाज आता चेन्नईच्या संघात
Just Now!
X