जगभरात सध्या करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहेत आणि उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. अशा परिस्थितीत करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व क्रिकेटपटू चाहत्यांना घरी बसण्याचे आवाहन करत आहेत. स्वत: क्रिकेटपटूदेखील घरात आहे. काही पूर्णपणे आपल्या कुटुंबाला वेळ देत आहेत, तर काही टिकटॉक आणि इतर प्रकारचे व्हिडीओ तयार करून स्वत:चे आणि चाहत्यांचे मनोरंजन करणारे क्रिकेटपटू लक्ष वेधून घेत आहेत. मात्र या दरम्यान सोशल मीडियावर फारसे अ‍ॅक्टिव्ह नसलेले आजी माजी क्रिकेटपटू मुलाखतीतून चाहत्यांच्या भेटीला येत आहेत.

T20 World Cup : धोनी, धवन संघाबाहेर; समालोचकाने जाहीर केला संघ

इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सलामीवीर अलिस्टर कूक याने नुकतीच संडे टाइम्सला एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत त्याने त्याला वाटणाऱ्या पाच महान फलंदाजांची नावं सांगितली. विशेष म्हणजे त्याने सांगितलेले चार विदेशी खेळाडू हे निवृत्त झालेले आहेत, तर एकमेव भारतीय फलंदाज सध्या क्रिकेट खेळतो आहे. कूक म्हणाला की २००४ साली वेस्ट इंडिजच्या संघविरुद्ध मी MCG क्रिकेट संघाकडून खेळत होतो. आमच्या संघात चांगले वेगवान गोलंदाज होते. सिमन जोन्स, मॅथ्यू होगार्ड, मीन पटेल … हे वेगवान गोलंदाज आमच्या संघात होते. सगळे पहिल्यापासून इंग्लंडमध्येच खेळलेले होते. अशा गोलंदाजांच्या माऱ्यापुढे ब्रायन लाराने उपहार आणि चहापान यांच्या मधल्या सत्रात शतक ठोकलं होतं. त्या वेळीच मी समजून गेलो की मी एक वेगळ्याच स्तरावरील अत्युत्तम फलंदाजी पाहत आहे.

“एकाच वेळी दोन सामने असल्यास विराटपेक्षा रोहितचा सामना बघेन, कारण…”

“लारासारखी फलंदाजी करणाऱ्यांमध्ये मी रिकी पॉंटिंग, जॅक कालीस आणि कुमार संगकारा यांची नावं घेईन. आणि सध्याच्या घडीला या महान फलंदाजांच्या गटात विराट कोहलीने नाव घ्यायलाच हवे. तो खेळताना अतिशय मुक्तपणे धावा करतो”, असं म्हणत कूकने निवृत्त झालेल्या महान फलंदाजांच्या यादीत विराटला नेऊन बसवलं.