फॅबिआन शोरच्या एकमेव गोलच्या बळावर स्वित्र्झलडने युरो चषक फुटबॉल स्पर्धेत अल्बेनियावर विजय मिळवला. सामना सुरु झाल्यानंतर पाचव्याच मिनिटाला शोरने गोल करत स्वित्र्झलडचे खाते उघडले. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अल्बेनियाच्या पहिल्याच लढतीत त्यांचा अननुभव जाणवला. अल्बानिआआचा बचाव भेदत शोरने झटपट गोल केला. मात्र यानंतर अल्बेनियाने स्वित्र्झलडच्या आघाडीपटूंना रोखले.
३६व्या मिनिटाला अल्बेनियाचा कर्णधार लोरिक काना याला पंचांनी पिवळे कार्ड दाखवले. प्रतिस्पर्धी खेळाडूला पाडल्याप्रकरणी कानावर ही कारवाई करण्यात आली. बदली खेळाडू म्हणून आलेल्या श्लेखझन गशीने गोल करण्याचा केलेला प्रयत्न स्वित्र्झलडच्या गोलक्षकाने रोखला. या विजयासह स्वित्र्झलडने तीन गुणांची कमाई केली.