News Flash

American Open 2017: सानिया-रोहन बोपन्नाची आगेकूच, पेस पराभूत

भारताची मदार सानिया मिर्झावर

इंडो-चायना एक्स्प्रेसचा अमेरिकन ओपनमध्ये धडाका

टेनिसपटू सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांनी अमेरिकन ओपन स्पर्धेत महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी स्पर्धेत आपापल्या साथीदारांसह पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. मात्र पुरुष दुहेरी प्रकारात भारताचा लिएँडर पेस आणि पुरव राजा यांना पराभवाचा सामना करावा लागला.

आपली चिनी जोडीदार पेंग शुईसोबत सायनाने २ तास १८ मिनीटात आपल्या प्रतिस्पर्धी जोडीचा ६-२, ३-६, ७-६ असा पराभव केला. तिसऱ्या सेटमध्ये ०-४ अशा पिछाडीवर पडलेल्या असताना सानिया आणि तिच्या जोडीदाराने प्रतिस्पर्ध्याला कडवी टक्कर देत सेटमध्ये बरोबरी साधली. यानंतर दोन मॅचपॉईंट वाचवत सानिया-पेंग जोडीने आपल्या तिसऱ्या फेरीचा सामना खिशात घातला.

फ्रेंच ओपन विजेत्या रोहन बोपन्ना आणि गॅब्रिएला दाब्रोस्की जोडीनेही आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात केली. रोहन आणि गॅब्रिएला जोडीने मारिया जोस आणि निकोलस मोनरो जोडीचा ६-३, ६-४ अशा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. उपांत्यपूर्व सामन्यात रोहन आणि गॅब्रिएला जोडीचा हाओ चिंग, मिशेल चॅन जोडीशी सामना होणार आहे.

पुरुष दुहेरी प्रकारात मात्र भारतीय जोडीला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. लिएँडर पेस आणि पुरव राजा जोडीला दुसऱ्या फेरीतून आपला गाशा गुंडाळावा लागला. याव्यतिरीक्त सिद्धार्थ बांथिया या तरुण खेळाडूलाही पहिल्याच फेरीत आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूकडून १-६, २-६ असा पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे अमेरिकन ओपन स्पर्धेत भारताची मदार आता सानिया मिर्झा आणि रोहन बोपन्ना यांच्यावरच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2017 8:39 pm

Web Title: american open 2017 sania mirza and rohan bopanna enters in next round with their respective partners leander pace face early exit
Next Stories
1 ‘फुलराणी’ची घरवापसी! पुन्हा गोपीचंदसोबत सराव करणार
2 प्रो-कबड्डीच्या पाचव्या पर्वातले आतापर्यंतचे ४ वादग्रस्त निर्णय
3 सचिनच्या आणखी एका विक्रमाशी कोहलीची बरोबरी, बुमराहची क्रमवारीत हनुमानउडी!
Just Now!
X