भारताच्या विश्वनाथन आनंदला लिजंड्स चषक ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने त्याला पराभवाचा धक्का दिला. चारपैकी पहिल्या तीन डावांमध्ये आनंदने कार्लसनला कडवी लढत देत बरोबरी पत्करण्यास भाग पाडले होते. मात्र अखेरच्या डावामध्ये कार्लसनने बाजी मारत ही लढत २.५-१.५ अशी जिंकली.

फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाड उद्यापासून

चेन्नई : फिडे ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा २५ जुलै ते ३० ऑगस्टदरम्यान रंगणार असून भारताचा माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद याच्यासह जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेला चीनचा डिंग लिरेन यांसारख्या अव्वल बुद्धिबळपटूंचा समावेश असणार आहे. पहिल्यांदाच ऑनलाइन होणाऱ्या या ऑलिम्पियाडमध्ये जवळपास १६३ देशांचे संघ सहभागी होणार आहेत.विदित गुजराथीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला सातवे मानांकन देण्यात आले आहे.