एकीकडे भारत पाकिस्तान सामन्याचे ऑन आणि ऑफ फिल्ड टेन्शन दिसत असताना नेटकरी मात्र सैराट झाल्याचे चित्र दिसत आहे. भारताला पहिल्या दोन विकेट्स अगदी सहज मिळाल्यानंतर अनेकांनी ट्विटवरून आनंद व्यक्त केला. मात्र लगेचच नेटकऱ्यांची गाडी भारताचे जावईबुवा म्हणजेच टेनिसपटू सानिया मिर्झाचा पती शोएब मलिकवर घसरल्याचे दिसत आहे. कायमच भारताविरुद्ध खेळताना दमदार कामगिरी करणाऱ्या शोएबने पाकिस्तानला एकामोगमाग एक दोन झटके लागल्यानंतर सावरले. मात्र जावई असला म्हणून काय झाले त्याच्यावर कोणतीही दया माया दाखवू नका असे भारतीय नेटकऱ्यांनी गोलंदाजांना सांगितले आहे. पाहुयात काय आहे नेटकऱ्यांचे शोएबबद्दल म्हणणे…

जावई आहे म्हणून तरी धावा करु द्या…

पोरीच्या घरच्यांना जावई नेहमी त्रास देतो

जावई असल्याने दया दाखवू नका

नेहमीसारखे जावईबुवा त्रास देणार

किती वर्षे खेळतोय हा

ताई पण खूष आणि दाजी पण खूष

जेव्हा तुम्ही मैदानात दाजींना पाहता

एकंदरित पाहता भारतीय नेटकरी जरी शोएब मलिकवर विनोद करण्यात व्यस्त असले तरी मलिकचा भारताविरुद्धचा आशियाई चषकातील रेकॉर्ड उत्तम आहे. आशियाई चषकामध्ये आत्तापर्यंत शोएब भारताविरुद्ध तीन सामने खेळला असून त्याने १४३, १२५ नाबाद, ३९ धावा केल्या आहेत. आजही त्याने दमदार सुरुवात केली आहे. शोएबने भारताविरुद्ध खेळताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये १० अर्धशतके आणि ४ शकते झळकावली आहेत. आजच्या सामन्यामध्ये या ३६ वर्षीय खेळाडूची खेळी निर्णायक ठरेल असेच चित्र सध्या दिसत आहे.