इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई खेळांमध्ये भारताच्या संजीव राजपूतने आणखी एकदा पदकाची कमाई केली आहे. ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात संजीवने भारताच्या खात्यात रौप्यपदकाची भर घातली आहे. यंदाच्या एशियाड खेळांमध्ये आतापर्यंत नेमबाजांनी भारताला मिळवून दिलेलं हे सहावं पदक ठरलं आहे.

५० मी. रायफल थ्री पोजीशन हा नेमबाजीतला सर्वात कठीण प्रकार मानला जातो. नेमबाजाला ३ प्रकारांमध्ये निशाणा साधायचा असतो. अशावेळी नेमबाजाचं आपल्या ध्येयावरचं लक्ष्य ढळून चालत नाही. संजीवनेही एकाग्रचित्ताने खेळ करत पहिल्या दोन प्रकारांमध्ये आघाडी कायम राखली. अखेरच्या क्षणांमध्ये संजीव राजपूतने कमी गुणांची कमाई केल्यामुळे तो तिसऱ्या स्थानावर फेकला गेला. याचा फायदा घेत चीनी प्रतिस्पर्ध्याने पहिलं स्थान पटकावलं. मात्र संजीवने वेळेतच स्वतःला सावरत रौप्य पदकावर आपलं नाव कोरलं