News Flash

Asian Games 2018 : पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत दाखल, जपानच्या यामागुचीवर केली मात

बॅडमिंटनमध्ये भारताचं किमान एक रौप्यपदक निश्चीत

Indian badminton player P. V. Sindhu

Indian badminton player P. V. Sindhu : भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत सिंधूने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीचा २१-१७, १५-२१, २१-१० अशा संघर्षपूर्ण लढतीत पराभव केला. या विजयासह सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला असून भारताचं किमान एक रौप्यपदक निश्चीत झालेला आहे. अंतिम फेरीत सिंधूची गाठ चीन तैपेईच्या ताई त्झु यिंगशी पडणार आहे. यिंगने उपांत्य फेरीत सिंधूची साथीदार सायनावर दोन सेट्समध्ये मात केली. उपांत्य फेरीत मिळवलेल्या विजयासह सिंधू बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

उपांत्य फेरीत सायना नेहवालला पराभव पत्करावा लागल्यानंतर सिंधूकडून भारताला सुवर्णपदकाची आशा होती. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सिंधूसमोर, जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अकाने यामागुचीचं आव्हान होतं. या सामन्यात सिंधूला तगडं आव्हान मिळेल असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र प्रत्यक्ष सामन्यात सिंधूने यामागुचीला चांगलचं झुंजवलं. सिंधूने आपल्या ठेवणीतल्या काही फटक्यांनी सुरेख गुण कमावले. पहिल्या सेटमध्ये यामागुची मानसिकदृष्ट्या खचलेली पहायला मिळाली. मात्र मध्यांतरानंतर यामागुचीने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत काही चांगले गुण मिळवले. यावेळी यामागुचीने केलेल्या स्मॅश फटक्यांचा वापर हा पाहण्याजोगा होता. पहिला सेट जिंकण्यासाठी अवघा १ गुण हवा असतानाही यामागुची सहज हार मानायला तयार नव्हती. अखेर सिंधूने आपला सर्व अनुभव पणाला लावत २१-१७ च्या फरकाने पहिला सेट खिशात घातला.

मात्र दुसऱ्या सेटमध्ये सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललं. पहिल्या सेटमध्ये पिछाडीवर पडलेल्या अकाने यामागुचीने आक्रमक खेळ करत सिंधूला पिछाडीवर टाकलं. मध्यांतरापर्यंत एका गुणाने आघाडीवर असणारी सिंधू मध्यांतरानंतर मागे पडली. यामागुचीने नेटजवळ खेळलेल्या सुरेख फटक्यांमुळे सिंधू पुरती गोंधळली. याचा फायदा घेत यामागुचीने दुसऱ्या सेटमध्ये आघाडी घेतली. ही आघाडी ४-५ गुणांवर गेल्यानंतर सिंधूने सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामागुचीने तोपर्यंत सेटवर आपली पकड मजबूत बसवली होती. अखेर १५-२१ च्या फरकाने दुसरा सेट जिंकत यामागुचीने सामना निर्णायक सेटमध्ये नेला.

तिसऱ्या सेटमध्ये सिंधूने वेळेतच सावरत सुरुवातीपासून आघाडी घ्यायला सुरुवात केली. या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये काही चांगल्या रॅली रंगल्या. यादरम्यान सिंधूने यामागुचीला फसवत ड्रॉपचे फटके वापरत चांगले गुण कमावले. अनेकदा यामागुचीने गुण मिळवण्याच्या नादात कोर्टवर लोटांगणही घातलं. तिसऱ्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सिंधूने आपल्याकडे ११-७ अशी आघाडी कायम ठेवली होती. अखेर २१-१० च्या फरकाने तिसरा सेट जिंकत सिंधूने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 12:41 pm

Web Title: asian games 2018 indonesia p v sindhu beat japans akane yamaguchi in semi final will fight for the bronze
Next Stories
1 ४ षटकं – ३ निर्धाव – १ धाव – २ बळी; जाणून घ्या कोणत्या गोलंदाजाने केली ही ऐतिहासिक कामगिरी?
2 Asian Games 2018 Blog : कबड्डीतला पराभव जितका धक्कादायक तितकाच चिंताजनक !
3 डॉन ब्रॅडमन यांना गुगलकडून मानवंदना, ११० व्या वाढदिवसानिमीत्त खास डूडल
Just Now!
X