Asian Games 2018 Live : आशियाई खेळांच्या स्पर्धेत आज भारताने समाधानकारक घोडदौड कायम राखत एका सुवर्णपदकाची कमाई केली. सातव्या दिवसाच्या खेळात भारताने गोळाफेक प्रकारात सुवर्ण पदकाची कमाई केली. गोळाफेकपटू तजिंदर पाल सिंग याने भारताला ही सुवर्णकमाई करून दिली. त्याने २०.७५ मीटरची विक्रमी फेक केली. या फेकीमुळे भारताला आजच्या दिवसातील पहिले सुवर्णपदक मिळाले. त्याआधी स्क्वॅशमध्ये दिपीका पल्लिकल हिने कांस्यपदकाची कमाई करत आपले खाते उघडले होते. त्यापाठोपाठ जोशना चिनप्पा, सौरव घोषाल यांनीही भारताला कांस्यपदकाची कमाई करून दिली होती.

तजिंदर पाल याने सर्वप्रथम १९.९६ मीटरची फेक केली होती. त्या नंतर सर्व प्रतिस्पर्ध्यांनी त्याची ही फेक मोडून काढल्याचा प्रयत्न केला. पण ते कोणालाही शक्य होऊ शकले नाही. चीनच्या खेळाडूने १९ मीटरचा टप्पा ओलांडला होता. पण त्या नंतरच्या प्रयत्नात तजिंदरने २० मीटरचा टप्पा ओलांडत थेट २०. मीटरची विक्रमी फेक केली. त्याची ही फेकदेखील कोणीही मोडू शकले नाही.