फिरकीपटू नॅथन लायनचे ५ बळी आणि त्याला मिचेल स्टार्कच्या प्रभावी माऱ्याची मिळालेली साथ याच्या बळावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा २७९ धावांनी पराभव केला. मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव अवघ्या १३६ धावांत आटोपला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-० अशी जिंकली. दमदार कामगिरी करणाऱ्या मार्नस लाबूशेनला सामनावीर आणि मालिकावीर असा दुहेरी सन्मान मिळाला.

रॉस टेलरचा धमाकेदार विक्रम; फ्लेमिंगला टाकलं मागे

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४५४ धावांची मजल मारल्यानंतर लायनच्या फिरकीपुढे न्यूझीलंडचा पहिला डाव २५१ धावांवर गडगडला. लायनने ६८ धावांमध्ये पाच बळी मिळवले. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला २०३ धावांची मिळाली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावातही दमदार खेळी केली. वॉर्नरच्या शतकानंतर ऑस्ट्रेलियाने २ बाद २१७ धावांवर डाव घोषित केला.

गांगुलीवर माझा विश्वास, तो ‘असं’ होऊच देणार नाही – शोएब अख्तर

मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरूवात अत्यंत खराब झाली. टॉम ब्लंडेल(२), टॉम लॅथम(१), जीत रावल(१२), फिलिप्स (०) आणि रॉस टेलर (२२) हे पाच फलंदाज झटपट बाद झाले. त्यामुळे न्यूझीलंडची अवस्था ५ बाद ३८ झाली होती. त्यानंतर कॉलिन डी ग्रँडहोमने दमदार अर्धशतक लगावत काही काळ संघर्ष केला. पण तोदेखील ५२ धावांवर बाद झाला. न्यूझीलंडचे ९ गडी १३६ धावांत बाद झाले. तर गडी दुखापतीमुळे फलंदाजी करू शकला नाही.

IND vs SL : जेव्हा अख्खं स्टेडियम एकत्र ‘वंदे मातरम’चा जयघोष करतं…

सामन्यात दमदार द्विशतक (२१५) लगावणारा मार्नस लाबूशेन सामनावीर आणि मालिकावीर ठरला.

संक्षिप्त धावफलक –

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : सर्वबाद ४५४ (लाबूशेन २१५, वॅगनर ६६-३)
न्यूझीलंड (पहिला डाव) : सर्वबाद २५१ (ग्लेन फिलीप्स ५२, लायन ६६-५)
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : २ बाद २१७ डाव घोषित (वॉर्नर १११)
न्यूझीलंड (दुसरा डाव) : सर्वबाद १३६ (ग्रँडहोम ५२, लायन ५०-५)