वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाने संघामध्ये दोन फिरकीपटूंना स्थान दिले आहे. त्यामुळे नॅथन लिऑनला साथ देण्यासाठी स्टीफन ओ’कीफेची निवड करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाने यापूर्वी दोन्ही सामने जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा सामना जिंकून त्यांना निर्भेळ यश मिळवता येईल. दुसरीकडे सातत्याचा अभाव असलेल्या वेस्ट इंडिजने मालिका गमावली

असली तरी अखेरचा सामना जिंकण्याची संधी त्यांच्याकडे नक्कीच आहे.